Sanjay Rathod Sarkarnama
विदर्भ

Sanjay Rathod News : अन्न व औषध प्रशासनवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; मंत्री राठोडांची पहिली प्रतिकिया,म्हणाले...

Shinde Fadnavis Government : ...म्हणून आरोप करणं चुकीचं!

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal News : शिंदे गटाचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत कार्यालयाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून अन्न व औषध प्रशासन या राठोड यांच्या मंत्रालयातील भ्रष्टाचार रोखण्याचं आवाहन केलं आहे. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांनी यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अन्न व औषध प्रशासनावर विभागावर महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनं केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपाचं खंडन केलं आहे. राठोड म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी बोगस औषधी वाटप केलं जातं. त्यावर कारवाई ह्या अन्न व औषध विभागकडून केली जात आहे. अशा 7000 कारवाया करण्यात आल्या आहेत.

विवेक कांबळे यांना ओरोफ्लोम इंजेक्शन दिलं. ते इंजेक्शन लोह वाढविण्यासाठी होतं. हे इंजेक्शन बनावट होतं. 40 दुकानावर कारवाई केली गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत कडक कारवाई केली म्हणून आरोप करणं चुकीचं आहे.

याबाबत कडक कारवाई केली म्हणून आरोप करणं चुकीचं आहे. ह्या कारवायांना सुनावणी न घेता स्थगिती द्यावी. यासाठी संघटनेकडून सांगितलं जातं. मात्र, क्षेत्रीय स्तरावर कारवाई झाली तर त्या कर्मचाऱ्यांचं मनोबल खचतं होते. त्यामुळे सुनावणी घेऊन सदर प्रकरणामध्ये कारवाई केली जाते. गैरसमजामधून संघटनेनं हे पत्र दिलं असल्याचंही संजय राठोड यावेळी म्हणाले आहेत.

काय आहे पत्र?

महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांचे कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टाचार असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त व तणावग्रस्त झालेले आहेत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

सभासदांना नाहक त्रास...

अन्न व औषध प्रशासनाकडून अनेकवेळा छोट्या छोट्या त्रुटींकरिता औषध विक्रेत्यांना अवाजवी शिक्षा केली जाते. औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार तरतुदीनुसार अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात मंत्री महोदयांकडे अपील करण्याची तरतूद कायद्यात असल्यामुळे औषध विक्रेते अपील दाखल करतात. या अपिलावर अनेकवेळा शिक्षेचा संपूर्ण कार्यकाळ संपून गेला तरीही मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून अनेक वेळा संपर्क करुन देखील निर्णय दिला जात नाही. यामुळे सभासदांना नाहक शिक्षा भोगावी लागत आहे.

प्रचंड पैशांची मागणी

प्रत्यक्षात औषध विक्रेत्यांना मंत्री महोदय यांचे स्वीय सहाय्यक डाँ. विशाल राठोड,संपत डावखर तसेच चेतन करीडीदेव यांच्याद्वारे प्रचंड पैशांची मागणी केली जात आहे. यापूर्वी या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री महोदयांच्या प्रत्यक्ष भेटून या प्रकाराची कल्पना दिल्यानंतर भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी आणखी वाढल्याचंच पाहायला मिळत असल्याचंही दि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT