Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसांच्या कर्नाटकात सभा, आपल्या वक्तृत्वाची जादू दाखवणार?

Karnataka Election 2023: देवेंद्र फडणवीसांनी याआधीही इतर राज्यात भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
Karnataka Election 2023 :  Devendra Fadnavis News :
Karnataka Election 2023 : Devendra Fadnavis News : Sarkararnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सर्वच पक्षांनी तिकीट वाटप केले आहे, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटकात भाजप-काँग्रेससह जेडीएस एकमेकांसमोर आहेत. यातच भाजपकडून निवडणुकीत प्रचारासाठी स्टार प्रचारकांची (BJP Star Campaigner) यादी जाहीर केली आहे.

या यादीमध्ये सर्वात मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत. त्याचप्रमाणे, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबरच मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), स्मृती ईराणी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ही समावेश आहे.

Karnataka Election 2023 :  Devendra Fadnavis News :
Nashik MNS News: पदाचा राजीनामा देत दातीर म्हणाले, जन्मभर मनसैनिकच राहीन!

विशेष म्हणजे, या यादीमध्ये निम्मे केंद्रीय मंत्रीमंडळ व ५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. यावेळी भाजपकडून सत्ता निसटणार असे, अनेक सर्व्हेतून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आपली पूर्ण ताकद लावणार असे दिसून येत आहे.

Karnataka Election 2023 :  Devendra Fadnavis News :
BRS Rally News : केसीआर यांच्या सभेला सोळा अटींसह परवानगी, पण स्थळ बदलले...

तसेच, यंदाच्या यावेळी गुजरातच्या धर्तीवर विधानसभेचे तिकीट वितरीत करण्याचे अनोखा निर्णय कर्नाटक राज्यात भाजपने घेतला आहे. यामुळे डॅमेज कंट्रोल पवित्र्यात भाजप दिसून येत आहे. आतापर्यंत कर्नाटकात अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपसमोर काँग्रेस तसेच काही प्रमाणात जेडीएसचं तगडं आव्हान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com