Sevak Waghaye  sarkarnama
विदर्भ

Sevak Waghaye : काँग्रेसचा माजी आमदार भाजपसोबत 'स्पॉट' , नाना पटोलेंना त्यांच्याच मतदारसंघात घेरणार!

Nana Patole Congress opposed sevak waghaye : सेवक वाघाये विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

राजेश चोरपे

Congress Vs BJP : भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर विरोधक सेवक वाघाये हे दिल्ली येथे भाजपच्या नेत्यांसोबत एका छायाचित्रात स्पॉट झाले आहेत. काँग्रेसमध्ये राजकीय भवितव्य दिसत नसल्याने ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. पटोले यांना विधानसभेत घेरण्यासाठी वाघायेंना समोर केले जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वाघाये काँग्रेस Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लाखनी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार होते. पटोले यांच्या वर्चस्वामुळे त्यांचे महत्त्व आता कमी झाले आहे. त्यांना दोन वेळा उमेदवारीसुद्धा नाकारण्यात आली आहे. नाना पटोले यांचा लोकसभेच्या उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या पराभव करण्यासाठी त्यांनी बंडखोरी केली होती. मात्र फक्त 10 हजार मते त्यांच्या पारड्यात पडली.

त्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची दारे आता जवळपास बंद झाली असल्याने त्यांना भाजपशिवाय पर्याय राहिला नाही. त्यांचे समर्थकसुद्धा यास दुजोरा देत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून विधान परिषदेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्याशी त्यांची जवळीक आहे.

पटोले आणि फुके यांच्यात मागील विधानसभेच्या निवडणुकीत एकदम चुरशीचा सामना झाला होता. यात शेवटी पटोले यांनी बाजी मारली होती. सध्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या पटोले यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. लोकसभेत त्यांच्या नेतृत्वात 13 खासदार निवडून आले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीतच नाना पटोलेंना घेरण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात आहे. याकरिता बेरजेचे राजकारण केले जाते. सेवक वाघाये सोबत बराच फायदा होईल, असे आडाखे बांधले जात आहे. भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्याऐवजी भाजपने लोकसभेसाठी परिणय फुके यांना पहिली पसंती दर्शवली होती. मात्र स्थानिक नेते आणि राष्ट्रवादीच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे पडले. आता मेंढे पराभूत झाले आहेत. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनी आपले वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपतर्फे आता भंडारा जिल्ह्यात भाजपतर्फे पुनर्बांधणी केली जात आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT