Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घ्या अन्‌ मंत्री करा; पुणे शहर राष्ट्रवादीचा ठराव

Pune NCP Leader Deepak Mankar Demands Rajya Sabha Seat For Ajit Pawar Wife Sunetra Pawar : या ठरावात सुनेत्रा अजित पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल, असं म्हटलं आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 10 June : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला असून सुनेत्रा पवार यांचे दिल्लीत जाण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.

मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीत पाठवण्याबाबतची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आज पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची (Baramati Lok Sabha Constituency) निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya sule) यांची सरशी झाली.

सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत झालेली पिछाडी बऱ्यापैकी भरून काढली, यामुळे सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कुटुंबातील उमेदवार सलग दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. मागील लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार (Parth Pawar) यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत बारामतीमधून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्यात यावं, असा ठराव करण्यात आला.

या ठरावामध्ये सुनेत्रा अजित पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल, असं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com