Lok Sabha Election 2024 : भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्या समृद्ध लोकशाहीला वाचविणे ही आता काळाची गरज झाली आहे. देशात गेल्या दहा वर्षांत जे काही सुरू आहे, ते नक्कीच धोकादायक आहे. यासाठी आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. विरोध करणाऱ्यांवर सरळसरळ ईडी कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे. पण अशा स्थितीतही न घाबरता अनेक जण विचारधारेशी एकनिष्ठ राहात खंबीरपणे लढा देत आहेत. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आल्यास राज्यात भाजपचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव करून सत्तापरिवर्तन करण्याची नितांत गरज असल्याचे विधान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले. चंद्रपुरातील गोंडपिपरीत त्यांचे काल जाहीर व्याख्यान झाले. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर कटाक्ष टाकला.
देशाचे नेतृत्व करणारे अतिशय खोटारडे आहेत. खोटे बोला पण रेटून बोला अशीच त्यांची भूमिका आहे. ही भूमिका देशहिताची नक्कीच नाही. देशात जे काही सुरू आहे. ते लोकशाहीसाठी घातक आहे. अशाना धडा शिकविण्यासाठी सत्तापरिवर्तन होणे अतिशय आवश्यक आहे. लोकशाहीत जनता राजा असते. भारतीय लोकशाहीने याचा अनेकदा प्रत्यय दिला. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. तो काळ आपण निव्वळ बघितला नाही तर आणीबाणी विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. अनेक लोक जेलमध्ये राहिले. पण जनतेने इंदिरा गांधी यांना धडा शिकविला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आत्ता देशात सुरू आहे ते त्या आणीबाणीपेक्षाही भयानक आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे आहे. या हुकुमशाहीला पुन्हा एकदा उखडून फेकण्याची गरज आता निर्माण झाली आहे. यासाठी समाजातील जाणकारांनी आता पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. त्यांनी वेळीच खबरदारी घेतली नाही तर देशातील लोकशाहीचा अंत होण्याची भीती नाकारता येणार नाही असेही प्रा.मानव म्हणाले. मानवतावादी विचार प्रबोधिनी,ओबीसी कृती समिती, शिक्षण बचाव समितीने गोंडपिपरीत प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम चंद्रपुरातील गोंडपिपरीत आयोजित केला होता.
प्रा. मानव यांनी भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर बोलताना सत्ताधारी भाजपच्या कारभारावर चौफेर बाण सोडले. शिक्षण व रोजगार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष शालीकराम माऊलीकर यांनी राजकारणात धर्म आणल्यामुळे देशाच वाटोळ होत असल्याचे सांगितले. विनोद चांदेकर, रूपेश निमसरकार, नगरसेवक अनिल झाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश चौधरी, उद्धव नारनवरे, सुनील संकुलवार, हनुमंत झाडे, नीतेश डोंगरे, सूरज माडुरवार यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.