Chandrapur ZP : जिल्हा परिषदेची शाळा वाचविण्यासाठी चिमुकल्यांची धडपड

Yenbothla Village : शाळा बंद करण्याचा डाव विद्यार्थीच हाणून पाडणार. चंद्रपूर, गडचिरोलीच्या सीमेवरील गावातील घटनेनंतर प्रशासन हादरले
Chandrapur Zilla Parishad School
Chandrapur Zilla Parishad SchoolSarkarnama

Chandrapur ZP : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरील येनबोथला हे शंभर वस्तीचे लहानशे गाव. वैनगंगा नदीकाठी वसलेल्या या गावात शेती व मासेमारी करून येथील गावकरी कसाबसा आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा चालवितात. येथील गरीब मजुरांची, कष्टकऱ्यांची, मासेमारी करणाऱ्यांची हल्ली झोप उडाली आहे. त्याचे कारण म्हणजे गावातील जिल्हा परिषदेची शाळा आता कायमची बंद होणार आहे. मुलांच्या शिक्षणाचे आता काय होणार? लहानशी मुले दररोज अनेक किलोमीटरचे अंतर कापून नवीन शाळेत कशी जाणार? या प्रश्नाने ग्रामस्थ पुरते व्यथित आहेत.

गावातील शाळा बंद होणार असल्याने चिमुकलेही कमालीचे अस्वस्थ आहेत. नुकताच गोंडपिपरीत विविध मागण्यांना घेत मोर्चा काढण्यात आला. यात येनबोथला शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपला नारा बुलंद केला. ‘आमची शाळा बंद करू नका’ असा आर्त टाहो त्यांनी फोडला. तहसीलदारांना चिमुकल्यांनी निवेदन दिले. हे चित्र बघून अनेकांच्या मनाला पाझर फुटला. पण प्रशासनाला या चिमुकल्यांच्या भावना कळणार का? असा संतप्त सवाल करीत कोणत्याही परिस्थितीत गावातील शाळा बंद होऊ देणार नाही. यासाठी जिवाची बाजी लावू, असा पावित्रा आता गावकऱ्यांनी घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrapur Zilla Parishad School
Chandrapur BJP News : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना अजूनही उमेदवारी मिळण्याची आशा; म्हणाले, मी मैदानात आहे !

राज्यातील 60 हजार शाळा बंद करण्यासाठी सरकार ‘अॅक्टिव्ह मोड’वर आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातीलही अनेक शाळा आहेत. कमी पटसंख्येचे कारण देत सर्वांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारच्या या निर्णयाला गावागावांतून विरोध होऊ लागला आहे. गरिबांच्या मुलांनी शिक्षणच घेऊ नये, अशी व्यवस्था सरकार निर्माण करीत आहे, अशी टीका केली जात आहे. पण येनबोथला येथील पालक व विद्यार्थी अजूनही हार मानायला तयार नाहीत. गोंडपिपरीत विविध मागण्यांना घेत मोर्चा काढण्यात आला. यात येनबोथला येथील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारी मुले मोर्चात सहभागी झालीत.

ग्रामस्थांनी थेट शिक्षण बचावचाच नारा बुलंद केला. या चिमुकल्यांनी तहसीलदार शुभम बहाकार यांना निवेदन सादर केले. येनबोथला गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर येतो. त्यामुळं गावाला जोडणारा मुख्य मार्ग ठप्प पडतो. तालुका मुख्यालयाशी गावाचा संपर्क तुटतो. पुरामुळे गावाला बेटाचे स्वरूप येत. अशा वेळी प्रशासनाची मदत पोहोचविणे कठीण असते. विठ्ठलवाडा गावाला जोडणारे रस्त्यावरील छोटे नाले व पूल तुडूंब भरून वाहतात. अशा परिस्थितीत नदी किंवा पूल पार करून पाण्यातून समायोजन केलेल्या शाळेत जाणे लहान बालकांना धोकादायक ठरू शकते. प्रसंगी जीव जाऊ शकतो.

Chandrapur Zilla Parishad School
Chandrapur Lok Sabha Constituency : पक्षांतर्गत स्पर्धा प्रतिभा धानोरकरांसह काँग्रेसच्याही मार्गातील अडसर

गावकऱ्यांनी प्रशासनाच्या नजरेत हा सर्व प्रकार आणून दिला. गावातील शाळा बंद केली तर मुलाचे शिक्षण बंद होईल, अशी भीती पालकांना आहे. त्यामुळे आता आम्ही जिवाची बाजी लाऊ, पण शाळा बंद होऊ देणार नाही, अशी भूमिका येनबोथला येथील गावकऱ्यांनी घेतली आहे. आमदार सुभाष धोटे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, गोंडपिपरीकडे त्यांनी दुर्लक्षच केले. तीन मोठ्या नद्या या भागातून वाहत असताना येथील शेतकऱ्यांना ते सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. गावागावांतील शाळा बंद करण्यात येत असताना त्यांनी कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही. केवळ किरकोळ विकासकामे करण्यापलीकडे त्यांना या मागास तालुक्यासाठी काही विशेष असे करता आले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याप्रती आता संताप व्यक्त होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Chandrapur Zilla Parishad School
Chandrapur News : भाजप नेत्याच्या गावात ‘धनदांडग्यांना’ घरकुल; गरीबांना केवळ भूल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com