Sharad Pawar-Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar : पवारांना सल्ला, 'महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं"

Maharashtra Politics : वाढदिवसाच्या दिवशी यांनी दिला शरद पवारांना सल्ला

Sudesh Mitkar

Nagpur News : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी पवारांना एक सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी पक्षात व कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे,ते पाहता शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं, अस त्यांनी सांगितले आहे.

शरद पवारांनी यांनी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या नागपूर येथील घरी सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर मनोहर म्हणाले, शरद पवार यांनी राज्याच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि त्यांच्या कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे. त्या सर्व गोष्टींना बाजूला सारून फक्त राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात लक्ष केंद्रित करून भाजपला हरवण्यासाठी बहुजनांना एकत्रित आणण्यावर काम शरद पवार यांनी करावे असे यशवंत मनोहर म्हणले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देश पातळीवर भाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न करावे. देशात सुरु असलेल्या 26 पक्षांच्या आघाडीला एकत्रित ठेवण्याच्या प्रयत्न पवारांनी करावेत. देशातील बहुतांशी बहुजनांना शरद पवार यांच्या बद्दल आदर आहे. त्यामुळे शरद पवार यांनी इंडिया आघाडीला मजबूत करावं असे मनोहर म्हणाले.

शरद पवारांसाठी खास पोस्ट

आज विविध स्तरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबूक पोस्ट केली असून त्यामध्ये पद्मविभूषण, मा. केंद्रीय कृषी मंत्री, भारत सरकार, खासदार मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT