Winter Session 2023 : 'हा तर महाराष्ट्राला लागलेला कलंक'...

Nana Patole in Nagpur winter session : या प्रकरणावरून काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सरकारला धारेवर धरले
Nana Patole, Devendra Fadnavis
Nana Patole, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमध्ये जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कलंक असे संबोधले होते. त्यावरून मोठे राजकारण पेटले होते. आता पुन्हा एकदा नगपुरातून काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी कलंक हा शब्द वापरुन सरकारवर टीका केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असा लढा जोरदार पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय केले पाहिजे, याचा अभ्यास करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे देण्यात आली आहे. या आयोगातील चार सदस्यांनी राजीनामा दिला असून या समितीचे अध्यक्ष असलेले माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी देखील मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. समतीचे सदस्य अशा पद्धतीने राजीनामा देत असल्याने समितीच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole, Devendra Fadnavis
Shivraj Singh Chouhan: 'दिल्लीत जाऊन काही मागण्यापेक्षा मी मरण पसंत करेन'...

मागासवर्गीय आयोगाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह काही मंत्री आयोगावर दबाव टाकत असल्याचा आरोप समितीचे सदस्यांकडून केला जात होता. वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे आयोगाचे अध्यक्ष देखील पुढील काळात राजीनामा देतील, अशी भीती तीन दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आली होती. ही भीती खरी ठरली असून आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आयोगाच्या सदस्यांनी तसेच अध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उमटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या सदस्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. सभासदांचे हे राजीनामे म्हणजे राज्याला लागलेला कलंक आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

Nana Patole, Devendra Fadnavis
Ajit Pawar : अजितदादांच्या 42 वर्षांच्या राजकीय प्रवासातील ठळक घडामोडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com