Sharad Pawar, Nitin Gadkari
Sharad Pawar, Nitin Gadkari  Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar Nagpur News : नागपुरात पोहोचलेल्या पवारांनी घेतली गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar and Nitin Gadkari News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध विकास कामांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. याभेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचेही सांगितले जात आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे च्या नागपूर उपकेंद्रासाठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार यांनी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

याआधीही गडकरी आणि पवार यांच्यात दिल्ली आणि काही दिवसापूर्वी पुण्यात भेट झाली होती. त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. या भेटीमागे राजकारण नसल्याचे बोलले जात असले तरी सध्या महाविकास आघाडी आणि शिंदे सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडी बघता या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, शरद पवार यांचा हा दौरा ऊसाच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. यावेळी शरद पवार यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. पवार यावेळी म्हणाले, जगाामध्ये ब्राझील ऊसाच्या धंद्यात पहिल्या नंबरवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. यंदा ब्राझीलमध्ये दुष्काळामुळे साखरेचे उत्पादन घटले, त्यामुळे भारत पहिल्या नंबरवर आला आहे.

साखर, वीज आणि इथेनॅालचे उत्पादन ऊसापासून होऊ शकते. महाराष्ट्रात मराठवाडा ऊस उत्पादनात पुढे चालला आहे. उत्तम ऊसाची लागवड होत आहे. पाणी आणि जमीनही चांगली आहे. ही जमीन आणि पाणी बघीतल्यावर याठिकाणी चांगले उस उत्पादन होऊ शकते, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT