Maharashtra politics : ''अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे परत येण्याच्या प्रयत्नात''

Vaibhav Naik News : उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.
Uddhav Thackeray, Eknath Shinde News
Uddhav Thackeray, Eknath Shinde NewsSarkarnama

Vaibhav Naik vs Narayan Rane News : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विरोध आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना वैभव नाईक म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभे करायचे आहे. मात्र, जनतेचा कौल हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहे. त्या मुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मी नाराज आहे, मी शिंदे गटात जाणार आहे, असा संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde News
Karnataka Assembly Election : महाराष्ट्र एकीकरण समिती सहा मतदारसंघात निवडणूक लढवणार : बेळगावमधील बैठकीत निर्णय

अनेक आमदार परत येण्यास तयार

जे आमदार आमच्यातून निघून गेलेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळत आहे. त्यांची मलिन झालेली प्रतिमा आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पाडल्याबद्दल जनतेत रोष आहे. त्यामुळे हे आमदार परत यायला तयार असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde News
Rahul Gandhi : राहुल गांधींना आणखी एक धक्का ; RSS ला 'कौरव' म्हणणं अंगलट ; मानहानीची नोटिस ; काय आहे प्रकरण ?

तसेच यावेळी नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन ते तीन महिन्यात जाणार हे भाकीत नाही, ती वस्तुस्थिती आहे. राणे यांचे शिवसेनेवर टीका करण्याचे काम होते. ते काम आता संपलेले आहे, त्यामुळे त्यांचे मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार असल्याचा दावा नाईक यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com