Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Bawankule On Sharad Pawar: परिवारातले लोक सोडून जात आहेत, आता शरद पवारांनी आपलं घर सांभाळावं !

Ajit Pawar News: स्वतः अजित पवार, पक्ष आणि शरद पवारही वेळोवेळी अडचणीत आले.

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar: अजित पवारांनी ज्या प्रकारे काल (ता. ५) राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आलेख मांडला. जीवन चरित्र मांडलं. त्यावरून वाटते की शरद पवारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे स्वतः अजित पवार, पक्ष आणि शरद पवारही वेळोवेळी अडचणीत आले. राजकारण परिवार तरी सोडायला पाहिजे. पण शरद पवारांनी राजकारणात आपल्या परिवारालाही सोडले नाही, अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Sharad Pawar did not leave his family in politics)

आज (ता. ६) सकाळी कोराडी येथील निवासस्थानी आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्या अजित पवारांनी जी भूमिका घेतली, ही महाराष्ट्रहिताची, देशहिताची आहे. काल छगन भुजबळ आणि इतरही नेत्यांनी सांगितले की, त्यांना हे पाऊल का उचलावे लागले. त्यावरून शरद पवारांचे राजकारण काय आहे, हे लक्षात येते.

अजित पवारांनी त्यांची आपबिती महाराष्ट्रातील जनतेपुढे मांडली. सत्य परिस्थिती मांडताना ‘मी महाराष्ट्राशी खोटं बोलणार नाही’, असे ठासून सांगितले. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर महाराष्ट्र विश्‍वास ठेवेल. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे भविष्यात जागा वाटपाचा प्रश्‍न उभा राहील का, असे विचारले असता, सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्‍न आता नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत आणि मुख्यमंत्रिपदीही तेच राहणार आहेत. काल मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती त्यामुळे नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागत केल्यानंतर ते परत मुंबईला गेले. याचा संबंध नाराजीशी जोडण्यात काहीही अर्थ नाही. काल मंत्री उदय सामंत यांनीही यावर भाष्य केले. त्यामुळे या सरकारमध्ये मतभेद नाहीत की मनभेद नाही, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

समरजीत घाडगे नाराज नाही. ते भाजपचे (BJP) निष्ठावान नेते आहेत. कसाही प्रसंग आला तरीही ते पक्षापासून फारकत घेऊ शकत नाही. उलट शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरातच मनभेद झाले. अजित पवारांनी त्याचे दाखले दिले. शिवसेनेसोबत गेल्यामुळे पवारांचे नुकसानच झाले. आज तर अशी परिस्थिती आली की परिवारही त्यांच्यापासून दूर जात आहे. शरद पवारांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आधी त्यांनी आपले घर सांभाळावे, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT