Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे म्हणाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हते म्हणून...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाने पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यास उशीर होत आहे, म्हणून उद्धव ठाकरे गटाने पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पण विधानसभा अध्यक्ष स्वतः वकील आहेत. ते नियमानुसार निर्णय घेतील. राहिला प्रश्‍न उद्धव ठाकरेंचा, तर त्यांना केव्हाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (They have the right to go anywhere anytime)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (ता. ५) कोराडी येथील जगदंबा मंदिराला भेट देणार आहेत, त्याची माहीती देताना आमदार बावनकुळे आज (ता. ४) बोलत होते. शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झालेले खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल विचारले असता, प्रफुल्ल पटेल यांनी काय खुलासा केला मला माहित नाही. शेवटी सकारात्मक राजकारणात जुळणे महत्वाचे आहे आणि जुळल्यानंतरही राज्याचं हित लक्षात घेऊन काही पावलं उचलावी लागतात. आता तिन्ही नेते मजबूत आहेत. जनतेचा विकास महत्त्वाचा आहे. खाते वाटप मुख्यमंत्री ठरवतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

पुढील विस्तारात कोण मंत्री बनेल किंवा आता मंत्री बनलेल्यांना कोणते खाते मिळेल, यापेक्षा राज्याचा विकास महत्वाचा आहे आणि तिच फडणवीस, शिंदे आणि पवार यांची प्राथमिकता आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सर्व आमदारांचा विश्‍वास आहे, असे बावनकुळे म्हणाले. अजित दादांचे बंड हे शरद पवारांचेच रचलेले नाट्य आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. यावर राज ठाकरे यांना त्याची तशी माहिती असेल म्हणून ते बोलले असतील, असे ते म्हणाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कार्यक्रम ठरला तेव्हा अजीत पवार उपमुख्यमंत्री नव्हते. म्हणून निमंत्रितांच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं, ते आता उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांचं नाव ॲड केलं आहे आणि त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणते खाते कुणाला द्यायचे आणि पालकमंत्रिपद कोणत्या जिल्ह्याचे कुणाला द्यायते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule News : शरद पवार डबल गेम करतात, यात त्याचा हातखंडा आहे !

आम्ही आज, उद्याची चिंता करत नाहीये, तर २०४७पर्यंत भारत देशाला विकसीत करण्यासाठी आणि भारत हा स्वयंपूर्ण देश व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे बावनकुळे म्हणाले. कोराडी येथे निर्माण करण्यात आलेले रामायणा सांस्कृतिक केंद्र हे देशातील सर्वोत्तम केंद्र आहे. असे केंद्र देशात कुठेही नाही. १८५७ पासून ज्या लढाया देशात झाल्या त्या आधारावर हे केंद्र उभारण्यात आले आहे. देखातलं मुख्य पर्यंटनस्थळ म्हणून या केंद्राची नोंद होईल, अशी माहीती आमदार बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दिली.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात उद्या (ता. ४) महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, भारतीय विद्या भवन्सचे राजेंद्र पुरोहित यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com