Ajit Pawar Banner Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar News : अजित पवारांच्या शुभेच्छा फलकावर नाही शरद पवारांचा फोटो; पवार म्हणतात, साहेबांच्या आदेशाचे पालन केले !

Ajit Pawar : शिंदेंच्या बंडानंतर प्रथमच येवढ्या वेगवान घडामोडी राज्यात घडत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

deputy cm of maharashtra Ajir Pawar News : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर प्रथमच येवढ्या वेगवान घडामोडी राज्यात घडत आहेत. अशात ‘माझा फोटो विनापरवानगीने कुठेही वापरू नका’, अशा सूचना शरद पवारांनी दिल्यानंतर कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. (Banners congratulating Deputy Chief Minister Ajit Pawar were seen in Nagpur)

आज सकाळी नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. यामध्ये शरद पवारांचा फोटो नाही आणि पक्षाचे चिन्ह घड्याळसुद्धा नाही. त्यावरून विविध चर्चांना पेव फुटले आहे. शरद पवारांच्या आदेशामुळे की अजित पवारांच्या आदेशामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो डावलण्यात आला, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सदर शुभेच्छा फलकावर वरती डाव्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. उजव्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा फोटो आहे. मध्यभागी अजित पवारांचा फोटो असून खाली डाव्या बाजूला मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचे फोटो आहेत. तर उजव्या बाजूला विदर्भातील नेते राजेंद्र जैन, सुनील फुंडे आणि प्रशांत पवार यांचे फोटो आहेत.

शहरात उलटसुलट चर्चा सुरू असताना प्रशांत पवार यांना विचारणा केली असता, पवार साहेबांनी सांगितले की, परवानगीशिवाय माझा फोटो कुठेही वापरू नये. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा तशीच सूचना केली. शेवटी आम्ही सर्व साहेबांचेच लेकरं आहोत. त्यांचा प्रत्येक आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे. आम्ही त्यांचा आदेश डावलू शकत नाही. आज बैठकीनंतर काय ठरते, हे बघून त्यानंतर भविष्यातील निर्णय घेतले जातील.

अजित पवार भाजपमध्ये (BJP) नाही तर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे यापुढे पक्षाच्या कार्यक्रमात आम्ही फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजप नेत्यांचे फोटो वापरणार नाही.

आमच्या फलकावर आमचे नेते आणि पक्षाचे चिन्ह घड्याळ असणार आहे. साहेबांचा (Sharad Pawar) फोटो वापरायचा की नाही, या निर्णयाची प्रतीक्षा करू. आमचे नेते अजित दादांनी (Ajit Pawar) तशा सूचना दिल्या, तर त्याचे पालन करू, असे प्रशांत पवार ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT