Vidhan Sabha Election 2024 : 'आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. जुमलेबाजी करीत नाही. विधानसभेच्या जाहीरनाम्यातून महाविकास आघाडीने पाच गॅरंटी दिली आहेत. ती पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा आम्हीच घेतो.' असं म्हणत शरद पवारांनी भाजपच्या जुमलेबाजीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज्यात परिवर्तन होणार असल्याचाही दावा केला.
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्यासाठी शरद पवारांनी आज प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना तीन हजार रुपये महिना, महिलांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखांचे कर्ज, बेरोजगारांच्या हाताला काम, दर महिन्याला चार हजराचे सहकार्य आणि २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा देऊ व सगळी औषध मोफत देण्याची गॅरंटी महाविकास आघाडीतर्फे देण्यात आली असून त्याची पूर्तसासुद्धा केली जाणार असल्याचे शरद पवारांनी(Sharad Pawar) सांगितले.
याचबरोबर शरद पवारांनी म्हटले की, 'सध्या राज्यात भाजपच्या विचाराचे शासन आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती. देशातही सत्ता होती. मात्र २०१९च्या निवडणुकीत भाजपला(BJP) सत्ता टिकवता आली नाही. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या राज्यात शेतकरी संकटात आहे. आत्महत्या करीत आहेत. कष्टाची किंमत मिळत नाही नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागत आहेत. राज्यातील जीवनामानाबाबात केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. येथील महिलांची स्थिती वाईट आहे. हे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, शेतकऱ्यांचे हीत बघत नाही आणि युवकांना रोजगारात देऊ शकत नाही.'
याशिवाय 'हे बघता आता भाजपच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागणार आहे. हेच आपल्या सर्वांना महत्त्वाचे काम करायचे आहे. महाविकास आघाडीचे(MVA) सरकार असताना शेती आणि उद्योगांना प्राधान्य देण्यात आले होते. महायुतीचे सरकार राज्यातून उद्योग घालवत आहे. केंद्रात भाजपची सत्ता येतातच फॉक्सकॉनला गुजरातला पळवण्यात आला. नागपूरमध्ये होऊ घाललेला विमान निर्मितीचा कारखाना तो सुद्धा गुजरातला गेला आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात. मात्र मोदी एकाच राज्याच्या हिताची भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही.' असंही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.