Devendra Fadnavis Eknath Shinde  sarkarnama
विदर्भ

Shivsena Vs BJP : भाजपच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे उपोषण, काय आहे प्रकरण?

Shisena BJP Devendra Fadnavis Eknath Shinde : काटोल मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. दुसरीकडे अनिल देशमुख राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार असल्याने अजित पवार यांनीसुद्धा या मतदारसंघावर दावा केला आहे.

Roshan More

Shisena Vs BJP : काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात महायुती एकत्रितच लढणार असल्याचे जाहीर केले असताना काटोल तालुक्यातील मोवाड शहरात शिवसेनेच्या वतीने भाजप नेत्यांच्या विरोधात साखळी उपोषण केले जात आहे.

शहरात सिमेंट रोड करायचे की डांबरी रोड यावरून वाद सुरू आहे. भाजपचे नेते चरणसिंग ठाकूर हे साखळी उपोषणाला बसलेल्या शिवसैनिकांची समजूत काढायला गेले होते. मात्र त्यांना अपयश आले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावार उद्‍भवलेला वाद महायुतीच्या उमेदवासाठी धोक्याच ठरू शकतो. मोवाड शहरात रस्त्यांच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपयांचा फंड मंजूर झाला आहे. येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव आहे.

मात्र शिवसैनिकांचा सिमेंट रोडला विरोध आहे. मोवाडीमधील रस्ते प्रशस्त आहेत. त्या तुलनेत करण्यात आलेली आर्थिक तरतूद तोकडी आहे. ग्रामीण भागातील सिमेंट रस्त्यांची गुणवत्ता अगदीच खराब असते. तो वर्षभराच्या टिकत नाही असा आजवरचा अनुभव आहे.

सोडतीन कोटींचा फंड असला तरी त्याचे तुकडे पाडून ठेकेदारांना काम देण्यात आले आहे. ठेकेदारांना 10-10 लाखांचे कामे देण्यात आली आहेत. यावर शिवसैनिक आणि भाजप नेत्यांमध्ये वाद उद्‍भवला आहे. रस्तेच करायचे असेल तर डांबरी करा, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

चरणसिंग ठाकूर काटोल-नरखेडमधील भाजपचे नेते आहेत. 2019 च्या निवडणुकी ते भाजपचे उमेदवार होते. राज्याचे माजी गृहमंत्र अनिल देशमुख यांच्या विरोधता ते लढले होते. या निवडणुकीत अनिल देशमुख विजयी झाले. असे असले तरी ठाकूर आणि देशमुख यांच्या मतांमध्ये फक्त 12 हजार मतांचे अंतर होते.

अजित पवारांचा काटोलवर दावा?

भाजप-शिवसेनेची युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे शिवसेनेनेसुद्धा या मतदारसंघावर दावा केला आहे. दुसरीकडे देशमुख राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार असल्याने अजित पवार यांनीसुद्धा या मतदारसंघावर दावा केला आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमार्फेत कोणीही निवडणूक लढली तरी विजय मतांचे अंतर फार राहणार नाही, अशी येथील परिस्थिती आहे. युती आणि आघाडीला येथे समान संधी आहे. अशा परिस्थिती महायुतीत निर्माण झालेला वाद आघाडीच्या उमदेवाराच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(लिंक कमेंटमध्ये)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT