Devendra Fadnavis Video : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार,हे लिहून घ्या'; फडणवीसांनी जरांगेंना स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation Devendra Fadnavis Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील मलाच का टार्गेट करत आहेत हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. काही लोक काही लोकांच्या खांद्यावर बसून बंदुक चालवत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis | Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले तरी अजून आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. एक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी मनोज जरांगे पाटील यांना स्पष्ट सांगितले आहे की त्यांनी शिवसेना (यूबीटी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावे की सत्तेत आलो तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ.'

'मनोज जरांगे पाटील मलाच का टार्गेट करत आहेत हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. काही लोक काही लोकांच्या खांद्यावर बसून बंदुक चालवत आहेत. पण आता मराठा समाजालाही समजायला लागले आहे की यात राजकारण होत आहे', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Assembly Election Video : विधानसभा निवडणूक आणि निकालाची तारीख ठरली, एकाच टप्प्यात निवडणूक?

' आरक्षणासाठी आम्ही सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण इतरांचे आरक्षणातून नको, असे सर्वच पक्षातील नेत्यांनी सांगितले. ते लेखी आहे.' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'मनोज जरांगे पाटील माझ्या आरोप करत आहेत की देवेंद्र फडणवीस हे आरक्षण मिळू देत नाहीत. पण मी सांगितले आहे आम्ही दोघे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री मिळून निर्णय घेत असतो. मुखमंत्र्यांनी सांगितले की आरक्षण देण्यात मी काही अडचण निर्माण करत आहे तर मी राजकारण सोडले आणि राजकीय निवृत्ती घेईल', असे आव्हान देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना दिले.

Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Rohit Pawar : भाजप आमदार 'कॉपी बहाद्दर'; रोहित पवार म्हणाले, 'त्यांनी 20 लाख रुपये देत...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com