Pooja Chavan Latest Marathi News, MLA Sanjay Rathod Latest News Sarkarnama
विदर्भ

पूजा चव्हाणची हत्या कशी झाली? राठोडांची 56 मिनिटांची सीडी असल्याचा नेत्याचा गौप्यस्फोट

संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी.

सरकारनामा ब्युरो

यवतमाळ : एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. या बंडखोर आमदारांमध्ये माजी वनमंत्री संजय राठोड यांचाही समावेश आहे. पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरूणीच्या हत्येचा आरोप झाल्यानंतर राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता. आता हेच प्रकरण पुन्हा एकदा राठोडांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. (Sanjay Rathod Latest News)

राठोडांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्यानंतर यवतमाळमधील शिवसैनिक (Shiv Sena) संतप्त झाले आहेत. राठोडांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याची सुरू कानावर पडत असतानाच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक संतापले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी थेट धमकीच दिली आहे.

राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांचे पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे समोर आणू. या प्रकरणातील 56 मिनिटांची ती सीडी आपल्याकडे आहे, असा दावा गायकवाड यांनी केला आहे. या सीडीमध्ये बंजारा समाजाची मुलगी राठोड यांनी कशी मारली हे उघड होईल, असा गौप्यस्फोट गायकवाड यांनी केला आहे.

पूजा चव्हाण या तरूणीवर राठोडांनी केलेले अत्याचार आम्हाला माहित आहेत. त्याचा पर्दाफाश केला जाईल, असंही गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. राठोडांवर टीका करणार भाजपचे नेते, चित्रा वाघ आता त्यांच्यासोबत कसे बसतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राठोडांनी माघारी येऊन माफी मागितली नाही तर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा गायकवाड यांनी जाहीर कार्यक्रमातून दिला आहे.

दरम्यान, गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये दोन गट पडल्याचा दावा पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जवळपास 15 ते 16 आमदार अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्यापैकी काहींशी नुकताच संपर्क झाल्याचेही ठाकरे म्हणाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT