Solapur News: शिवसेनेला दे धक्का; माजी आमदार नारायण पाटील शिंदे गटात

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना सातत्याने समर्थन वाढत चालले आहे.
Shiv Sena Latest News, Narayan Patil News, Solapur Latest Marathi News
Shiv Sena Latest News, Narayan Patil News, Solapur Latest Marathi NewsSarkarnama

सोलापूर : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील अनेक आजी-माजी पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहे. अनेकांनी शिंदे गटात जाणे पसंत केले आहे. आता सोलापूरातून शिवसेनेला धक्का बसला आहे. करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) हेही शिंदे गटात सामील झाले आहेत. (Shiv Sena Latest Marathi News)

नारायण पाटील हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. पण 2019 मध्ये शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. तेव्हापासून ते शिवसेनेत नाराज होते.

Shiv Sena Latest News, Narayan Patil News, Solapur Latest Marathi News
जहालत, एक किस्म की मौत है और..! संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांवर पुन्हा हल्ला

दरम्यान, गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांमध्ये दोन गट पडल्याचा दावा पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जवळपास 15 ते 16 आमदार अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्यापैकी काहींशी नुकताच संपर्क झाल्याचेही ठाकरे म्हणाले आहे. पण ठाकरे हा दावा करत असले तरी प्रत्यक्षात हॉटेलमध्ये सर्व आमदार एकत्रितपणे मजेत राहत असल्याचे अनेक व्हिडीओ व छायाचित्रांवरून दिसत आहे. (Eknath Shinde Latest News)

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सोमवारी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, आमच्या संपर्कात नसलेल्या दुसऱ्या गटातील आमदार पळून गेलेले आहे. त्यांच्यामध्ये परत येण्याचे धाडस आणि नैतिकता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृतीमुळे चोवीस तास काम करणे शक्य नव्हते, त्यानंतर ते काम करत होते. त्या काळात हे षडयंत्र रचलं गेल्याची नाराजी आदित्य यांनी व्यक्त केली.

Shiv Sena Latest News, Narayan Patil News, Solapur Latest Marathi News
मोठी बातमी : बंडखोर आमदारांसाठी सरकारी अधिकाऱ्याने हॉटेल केलं बुक; अजून बील थकित

ज्यांना पुन्हा परत यायचे आहे, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहे. त्यांच्यामध्ये खरंच हिंमत असेल तर पदाचे राजीनामे देऊ आमच्यासमोर उभे राहून दाखवावे, असं आव्हानही ठाकरे यांनी केले. फ्लोअर टेस्ट आधी त्यांना नैतिकतेची टेस्ट द्यावी लागेल, असंही ते म्हणाले.

पुरस्थिती असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलबाहेर सीआरपीएफ, आर्मीची सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. वास्तविक या जवानांना काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी तैनात करायला हवे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी कुणाचंही नाव न घेता भाजपला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com