Shinde Group MLA Sarkarnama
विदर्भ

Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाकडून 'हा' दावा!

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana Shivsena News : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवार (10 जानेवारी) रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. दरम्यान या निकालामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आतापासूनच सुरू झाल्या आहेत.

यावर बुलढाणा येथील शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'आमच्याच बाजूने हा निकाल येणार आहे. कारण आमच्याकडे सध्या बहुमत आहे. ज्यांच्याकडे बहुमत असतं कायदाही त्यांच्या बाजूने असतो, असा दावाही त्यांनी केला आहे. बुलढाणा येथे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील अनेक दिवसापासून राज्यातील शिवसेना(Shivsena) आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुरू आहे. या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. या विविध विधानामुळे नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाणा येथील शिवसेना (शिंदे गट) गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वक्तव्य केलं आहे.

निकालावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 'उद्याचा निकाल हा आमच्याच बाजूने असेल कोणीही काहीही म्हणो मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष, चिन्ह दिलं आहे. आमच्याकडे 40 आमदारांचे बहुमत आहे.'

ऑन मेरिट, बहुमताच्या आधारावर आणि घटनात्मक अधिकाराच्या आधारे हा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना आमदार अपात्रतेवर व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या बाजूने लागूच शकत नाही. कारण असा कुठला कायदाच देशात जगामध्ये नाही. बहुमताने कायदा बनत असतो आणि बहुमत आमच्याकडे आहे असे यावेळी संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान दोन्ही शिवसेनेच्या गटाकडून निकालावर दावा करण्यात येत आहे. आमच्याच बाजूने हा निकाल लागणार अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.मात्र आता निकाल काय लागेल याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

(Edited by : Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT