Warora Police Seized Drug Sarkarnama
विदर्भ

Shivsena : ड्रग्ज तस्करीत शिवसेना पदाधिकारी अडकला! पोलिसांनी मोठं घबाड केलं जप्त

Warora Police Seized Drug: या पदाधिकाऱ्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, हा आरोपी शिंदेसेनेच्या वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

Amit Ujagare

Shivsena : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला मुद्देमालासह अटक केली आहे. या पदाधिकाऱ्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी शिंदेसेनेच्या वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पद्मालय नगर येथील एका व्यक्तीने आपल्या वाहनात अवैधरित्या एमडी ड्रग्ज बाळगल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार वरोरा पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला आणि गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दीकी (वय ३६) याला ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यात चार झिपलॉक पिशव्यांमध्ये ठेवलेले पांढऱ्या भुरकट रंगाचे ५.७८० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज आढळून आले. या एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जसह कार, मोबाईल असा एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सिद्दीक याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये २७ हजार रुपयाचं ड्रग्ज स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर कार (किंमत १० लाख रुपये) आणि मोबाईल फोन (किंमत १० हजार रुपये) अशा प्रकारे एकूण १० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २१ (ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT