Bomb Threat: मुंबई, पुण्याच्या महापौरांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल; महापालिकेची इमारत केली रिकामी; नागपूरमधील ठिकाणंही टार्गेटवर

Bomb Threat: ई-मेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.
Manjusha Nagpure_Ritu Tawade
Manjusha Nagpure_Ritu Tawade
Published on
Updated on

Bomb Threat: राज्यात एक खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे, त्यानुसार, मुंबई आणि पुण्याच्या महापौरांना धमकीचे ई-मेल आले आहेत, त्यामध्ये बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूर शहरात देखील बॉम्बस्फोट घडवून आणण्याची आणि काही विशिष्ट ठिकाणं टार्गेटवर असल्याचा उल्लेखही या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या ई-मेलनंतर पुणे महापालिकेची इमारत मनुष्यविरहित करण्यात आली होती.

Manjusha Nagpure_Ritu Tawade
Nashik MLC Election: गोकुळ गितेंचा करारी बाणा! म्हणाले, महाजनांचा अन् माझा संबंध नाही, कोणीही भेटायला येऊ द्या माघार नाही; दराडेंचं वाढलं टेन्शन

ई-मेलमध्ये काय?

महापौरांना मिळालेल्या ई-मेलनुसार पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे तसेच RSS मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

Manjusha Nagpure_Ritu Tawade
Nashik Shivsena UBT : कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी पण रस्ता दुरूस्तीसाठी पैसे नाहीत; ठाकरेंच्या नगरसेविकेने स्वखर्चाने दुरुस्त केला गावचा रस्ता!

यंत्रणा सतर्क

धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग सतर्क झाला असून, ई-मेलची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ई-मेल कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला, तो खरा आहे की बनावट? याची तपासणी यंत्रणांकडून केली जात आहे. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून, सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात सुरक्षा वाढवली आहे.

Manjusha Nagpure_Ritu Tawade
Mantralaya Restructuring: मंत्रालयात मोठा बदल! 33 ऐवजी 45 विभाग; निर्णय प्रक्रियेला मिळणार वेग

महापालिका इमारत रिकामी

पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालय व माननीय महापौर कार्यालय या ठिकाणी बॉम्बस्फोटाचा ई-मेल थेट प्राप्त झालेला आहे. याच्या धर्तीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार संपूर्ण मुख्य इमारत खाली करण्यात आली असून बॉम्ब शोधक पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. शोधकार्य पूर्ण झाल्या नंतरच मुख्य इमारतीतील कामकाज पुन्हा सुरु होईल, तोपर्यंत पुणे महानगरपालिका आवारात प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com