Shiva Rajyabhishek Year Ceremony News : महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ते यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा उद्या (ता. २ जून) रायगडावर भव्य रुपात साजरा होणार आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी करीत आहे. (The 350th coronation ceremony was a historic event)
देशभरातल्या ११०८ पावन ठिकाणांहून आणलेले जल एकत्रित करून अभिषेक केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक ठरावा, पुन्हा तो क्षण विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून मंत्री मुनगंटीवार यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी मौजे पाचाड, किल्ले रायगड यासोबतच मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रम होणार आहेत.
उद्या सकाळी ८.३० वाजता होणाऱ्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार उदयनराजे भोसले, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, आमदार आदिती तटकरे, आमदार नरेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र साळवी उपस्थित राहणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, श्री. शिवाजी रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष रघोजीराजे आंग्रे, शिराज्यभिषेक दीनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कला मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रागयडचे फत्तेसिंह सावंत यांचीसुद्धा उपस्थिती राहणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्याच्या सांस्कृतिक विभागाने मैलाचा दगड ठरतील अशी कामे केली. त्यामध्ये अफजलखानाच्या कबरीभोवतालचे अतिक्रमण काढले. अयोध्येतील राम मंदिरासाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील काष्ठ समारंभपूर्वक पाठवले. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीसाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान लाकडाचा वापर करण्यात आला. याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात केला होता.
‘जय जय महाराष्ट्र माझा...’, हे राज्यगीत झाल्याची घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ३१ जानेवारी २०२३ रोजी केली. प्रतापगडावर श्री तुळजाभवानी देवी रजतछत्र अर्पण सोहळाही याच सरकारच्या काळात घेण्यात आला. छत्रपतींनी (Chhatrapati Shivaji Maharaj) जेव्हा अफजलखानाचा वध केला, तेव्हा वापरलेली वाघनखं महाराष्ट्रातील (Maharashtra) शिवभक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याबाबत ब्रिटनच्या उच्चायुक्तांनी मंत्री मुनगंटीवार यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराजांची जगदंबा तलवार आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.