Akola Sarkarnama
विदर्भ

Akola : शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग फसला; वंचित जोरात, अन् 'इंजिन'ही झाले स्टार्ट !

Shivsena : उद्धव ठाकरे गटाकडून काही ठिकाणी शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग करण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

Grampanchayat Election Results Analysis : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काल लागलेल्या निकालात अकोला (Akola) जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujav Aghadi) निम्म्यापेक्षा जास्त जागांवर आपले सरपंच बसवले आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून काही ठिकाणी शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग करण्यात आला, पण तो सपशेल फसला. या निवडणुकीचे वेगळेपण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन येथे सुरू झाले आहे. भविष्यात इंजिन येथे वेग घेणार का, हे बघावे लागणार आहे.

शहरानजिकच्या मासा आणि बाळापूर तालुक्यातील सागद या दोन ग्रामपंचायतींवर मनसेचे (MNS) उमेदवार सरपंचपदी विराजमान झाले आहेत. ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे वर्चस्व असलेल्या अकोला जिल्ह्यात कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फारसा प्रभाव पाडू शकली नाही. शिंदे गटाने खातेही उघडले नाही आणि शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या मतांचे विभाजन झाल्याचे बघायला मिळाले. वंचितने ही निवडणूक राजकीय पक्ष म्हणून लढविली आणि निवडणुकीपूर्वीच त्यांनी आपले सरपंच घोषीत केले होते. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला आणि निम्म्यापेक्षा अधिक जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले.

नवख्यांना संधी..

या निवडणुकीत काही ठिकाणी दिग्गजांना फटका बसला तर काही ठिकाणी नवख्यांना संधी मिळाली. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून झाल्यामुळे निवडणुकीत उत्साह दिसून आला. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असून, काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त निवडणुकीत मतदारराजाने एकाच पॅनलला निवडून न देता संमिक्ष कौल दिला आहे. दरम्यान गावकारभारी व सदस्यांच्या विजयानंतर उमेदवार व त्यांच्या समथर्कांकडून जल्लोषसुद्धा करण्यात आला.

दावे - प्रतिदावे…

जिल्ह्यात झालेल्या २६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक १४० सरपंच वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केला आहे. वंचितने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या यादीतील १०५ तर जाहीर न केलेल्यांपैकी ३५ सरपंच निवडून आले असल्याचा दावा देंडवे यांनी केला आहे. भाजपनेही पक्षाचे १०४ उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले असल्याचा दावा केला असून, समर्थन दिलेल्या सदस्यांसह १२३ सरपंच जिल्ह्यात भाजपचे निवडून आले असल्याचा दावा भाजपने केला आहे. शिवसेनेकडूनसुद्धा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्ह्यात एकूण ११३ सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. जिल्ह्यात २६२ सरपंच निवडून आले. मात्र, दावा सर्वच पक्षांनी केला असल्याने नेमके कुणाचे किती सरपंच याबाबत चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. पुढील चार-पाच दिवस हे दावे सुरूच राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT