Grampanchayt Result : दानवेंनी ग्रामपंचायत राखली, भावजय विजयी, तिकडे मेव्हणाही जिंकला..

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांच्यासाठी हा दुग्धशर्करा योग ठरला आहे.
Raosaheb Danve, Grampanchayat News, Aurangabad
Raosaheb Danve, Grampanchayat News, AurangabadSarkarnama

Raosaheb Danve : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ज्या जवखेडा खुर्द या आपल्या जन्मगावातून राजकारणाचा श्रीगणेशा केला, त्याच गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत Grampanchayt Result त्यांची भावजय सरपंच पदावर निवडून आल्या आहेत.

Raosaheb Danve, Grampanchayat News, Aurangabad
Gram Panchayat Results : राष्ट्रवादीच्या राजेश टोपेंना होम पिचवरच जोरदार धक्का!

गेल्या ३० वर्षापासून दानवे (Raosaheb Danve) यांच्या पुढाकारामुळे जवखेडा खुर्दची निवडणुक बिनविरोध व्हायची. यंदा मात्र दानवेंची शिष्टाई कामाला आली नाही आणि सरपंच पदासह काही सदस्यांसाठी निवडणूक झाली. (Bjp) आज मतमोजणी होवून निकाल हाती आला तेव्हा दानवे यांच्या भावज सुमन मुधकर दानवे या विजयी झाल्या आहेत.

तर दुसरीकडे दानवे यांची सासुरवाडी असलेल्या निल्लोडमध्ये देखील त्यांचा मेव्हणा विलास पुर्णाजी आहेर विजयी झाल्याचे समजते. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्यासाठी हा दुग्धशर्करा योग ठरला आहे. सुमन दावने यांनी सरपंचपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनिता संतोष दानवे यांचा पराभव केला आहे.

सुमन यांच्या विजयाने ३० वर्षापासूनच्या सत्तेची परंपरा भाजपने कायम राखली आहे. जवखेडा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये एकूण ७ सदस्य संख्या आहे. पैकी ४ सदस्य बिनविरोध निवडण्यात आले होते. त्यामुळे सरपंच पदासह दोन सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com