Abhijit Adsul Sarkarnama
विदर्भ

Loksabha Election : महायुतीच्या मेळाव्यात अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने ठोकला दावा!

Amar Ghatare

Amravati Loksabha constituency : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामध्येच अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून शिवसेनेने दावा ठोकला असून 'आम्ही या ठिकाणी जिंकून येऊ' असा विश्वास शिवसेनेचे(शिंदे गट) माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी रविवारी अमरावतीमध्ये व्यक्त केला.

सध्याच्या अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा(Navneet Rana) ह्या महायुतीमध्ये असून त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की आपण येणारी लोकसभेची निवडणूक महायुतीकडून लढू. याला भाजपने सुद्धा दुजोरा दिला असला तरी रविवारी अमरावतीमध्ये महायुतीकडून घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी अमरावती लोकसभा उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे.

'अमरावती लोकसभेवर पाच ते सहा वेळा शिवसेनेचा खासदार राहिला आहे, त्यामुळे आम्ही या जागेवर उमेदवारी मागणं वावगं नाही.' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर, 'आजचं वातावरण आणि अमरावतीचे संपूर्ण सर्वे हे स्थानिक खासदारांच्या विरोधात आहे. त्यामुळे महायुतीच्या मेळाव्यात सर्व पक्षांचा सूर हा या ठिकाणी दुसरा उमेदवार असावा असा निघाला. म्हणून माजी खासदार आनंदराव अडसूळ(Anandrao Adsul) किंवा मी स्वतः या ठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार असेल.', अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच 'महायुतीला 405चा आकडा जर पार करायचा असेल तर या ठिकाणचा उमेदवार बदलल्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणचा उमेदवार बदलल्या जाईल आणि शिवसेनेचा उमेदवार जिंकून येईल. असा विश्वासही अडसूळ यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार रवी राणा व खासदार नवीनत राणा यांनी प्रत्येकवेळी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना हीन वागणूक दिली आहे. बच्चू कडू आणि प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांच्या बद्दलसुद्धा त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्यामुळे बच्चू कडू(Bacchu Kadu) हे नाराज होते व ते या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाही.

म्हणून शिवसेनेला जर अमरावती लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, तर त्या महायुतीच्या विजय झालेल्या 400 उमेदवारांमध्ये अमरावतीचा उमेदवार जाणार नाही, असा इशारा सुद्धा यावेळी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT