Bhavana Gawali : महायुतीच्या नेत्यांना भावना गवळींची थेट धमकी; म्हणाल्या, ‘फिर जो भी होगा...’

Sanjay Rathod : महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा यवतमाळ-वाशिम मतदारसंघावर दावा
Bhavana Gawali
Bhavana GawaliSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Political News : वाशिम-पुसद आणि यवतमाळ-वाशिम या दोन लोकसभा मतदारसंघात पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम शिवसेना शिंदे गटाच्या खा. भावना गवळी यांच्या नावे आहे. परिणामी, याही लोकसभा निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा आत्मविश्‍वास गवळी यांना आहे.

असे असले तरी आज झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात घटक पक्षांनी आपआपल्या पक्षाची भक्कम दावेदारी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या खा. गवळी यांनी ‘फिर जो भी होंगा देखा जायेगा’, असे म्हणत एकप्रकारे महायुतीत सामिल घटक पक्षांच्या नेत्यांना एकप्रकारे माझी उमेदवारी कापून दाखवा, अशी थेट धमकीच दिल्याचे दिसून आले.

Bhavana Gawali
Mahayuti Melva : धाराशिव महायुतीच्या मेळाव्यात 'असमन्वय'; शिंदेच्या इच्छुक नेत्याला...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे समर्थक वाशीममधील रिसोडचे पुंडलिकराव गवळी हे राजकीय क्षेत्रात मजल-दरमजल करीत खासदार झाले. त्यांच्या शब्दाला राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात मोठे वजन होते. त्यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून भावना गवळींनी त्यांचा वसा चालवण्याचा निर्णय घेतला.

पुंडलिकराव गवळींच्या निधनाने वाशीम लोकसभा मतदारसंघात 1999 मध्ये पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अनंतराव देशमुख यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर भावना गवळींची राजकीय कारकीर्द बहरत गेली. त्यांनी माजी मंत्री मनोहर नाईक, शिवाजीराव मोघे, हरिभाऊ राठोड, मागील निवडणुकीत माणिकराव ठाकरे आदी दिग्गज नेत्यांचा पराभव केला आहे.

Bhavana Gawali
Milind Deora : देवरांचा प्रवेश दिल्लीत ठरला, शिंदेंना कानोकान नव्हती खबर !

मातब्बर राजकारण्यांना लोकसभेच्या रणांगणात तब्बल पाचवेळा लोळवल्याने भावना गवळी (Bhavana Gawali) ‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा प्रत्येक निवडणुकीतील तोच आत्मविश्‍वास आजही कायम आहे. त्यातूनच त्यांनी यवतमाळ येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात आपली धमक दाखवून दिली. माझे तिकिट कापून दाखवा, त्यानंतर काय होईल ते पाहून घेईन, असा इशाराच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांना दिला. भावना गवळींच्या या विधानानंतर सभागृहात चर्चांना उधाण आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिग्रस विधानसभा माझा...

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून यवतमाळचे विद्यमान पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना उमेदवारी दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. शिवाय, पालकमंत्री राठोड हे स्वत:च लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. त्यांच्या परंपरागत दारव्हा-दिग्रस मतदारसंघात ते स्वत:च्या मुलीला विधानसभेची उमेदवारी देतील, असेही बोलले जात आहे. ही माहिती खासदार भावना गवळींपासून लपून राहिलेली नाही.

हा धागा पकडून पालकमंत्री राठोडांना, 'संजयभाऊ आपल्याला लोकसभा लढायची असेल तर खुशाल लढा. मात्र, मग माझा दारव्हा-दिग्रस या विधानसभा मतदारसंघावर दावा राहील, असे त्यांनी स्पष्टच बोलून दाखवले. यानंतर, फिर जो भी होंगा देखा जायेगा,' असे म्हणत महायुतीतील नेत्यांना एकप्रकारे आव्हानच दिले. यानंतर पालकमंत्री राठोडांनी कोणतेही भाष्य करणे टाळले. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची दिलजमाई झाली की, भविष्यात कुरघोडी होणार, हा येणारा काळच सांगेल.

(Edited by Sunil Dhumal)

Bhavana Gawali
Anandraj Ambedkar News : छत्रपती संभाजीनगरमधून आनंदराज आंबेडकर उतरणार रिंगणात ? कार्यकर्त्यांचा आग्रह..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com