Nagpur News : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरून राज्यातील महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर टोलेबाजी केली जात आहे. विरोधकांमार्फत चाकणकर यांना धारेवर धरल्या जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना क्लीन चिट दिली आहे. भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यासुद्धा चाकणकरांच्या मदतीसाठी धावून गेल्या आहेत. यावरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. चित्रा वाघ या बाई सोयीनुसार पलटतात, भूमिका घेतात. हगवणे कुटुंबाबत महायुतीच्या नेत्यांची तत्परता कुठे गेली होती, असा सवाल उपस्थित करून त्यांनी पक्षपातीपणाचाही आरोप केला.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात चांगलेच गाजत आहे. राज्य महिला आयोगाने गांभीर्याने हे प्रकरण घेतले नसल्याने रुपाली चाकणकर यांच्यावर चौफेर आरोप केले जात आहे. त्या अडचणीत आल्याचे दिसताच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) त्यांच्या मदतीला धावून गेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही त्यांनी पाठराखण करून क्लीन चीट दिली. यावरून सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
हगणवे पाठोपाठ भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबीयामार्फत सुनेचा छळाचे प्रकरणालाही त्यांनी वाचा फोडली. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे बुधवारी (ता.28) नागपूरला आल्या होत्या. जेवढी तत्परता चाकणकर यांच्यासाठी दाखवल्या जात आहे तेवढीच हगवणे आणि फुके यांच्या स्नुषा प्रिया फुके यांच्याबाबत का दाखवली नाही असा सवाल उपस्थित केला.
संजय शिरसाठ यांच्या विरोधात तक्रार घेऊन आलेल्या महिलाने स्वतःहून माघार घेतली की त्यांच्यावर दबाव टाकला, याबद्दल माहिती घ्यावी असे सांगून महायुतीच्या पक्षपातीपणा आमचार खरा आक्षेप आहे हेसुद्धा त्यांनी बजावले.
नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार, नारायण राणे, निलेश राणे यांच्यावरही टीका केली. हे सर्व भाजपचे स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेते आहेत. सिंदूरचा हॅशटॅग चालवतात.
हिंदू व मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करतात असाही आरोप केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील की नाही हे मला माहित नाही. याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतली असे सांगून त्यांनी या विषयावर भाष्य टाळले.
वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांकडून सातत्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची जोड उठवण्यात येत आहे. अशातच भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी मात्र चाकणकर यांची पाठराखण करत या प्रकरणात फक्त एकालाच टार्गेट करणं चुकीचं असल्याचं सांगत भरोसा सेलसह इतर यंत्रणांची देखील चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.