चंद्रपूर : एखाद्या मर्डर मिस्ट्री सिनेमाची कथा म्हणून शोभेल अशी थरारक आणि भयानक घटना चंद्रपूरमधून समोर आली आहे. एका पोलीस महिलेनं स्वतःच्या वडिलांना मिल्कशेकमध्ये विष टाकून संपवलं. पण तीन वर्षानंतर तिचा हा कारनामा अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर उघडकीस आला. तिच्या प्रियकरानं हा प्रकार उघडीस आणला त्यामुळं केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरुन गेला आहे.
25 एप्रिल 2023 रोजीची सकाळ! चंद्रपूरमधील पोलीस अधिकारी जयंत बल्लावर (वय ४५) ड्युटीवर जाण्यासाठी नेहमीप्रमाण तयार होऊ निघाले. त्यांची मुलगी आर्या जी सध्या एक पोलीस कर्मचारी आहे तिनं त्यांना मिल्कशेक करुन दिलं. वडिलांनी ते मिल्कशेक प्यायलं आणि ते कामावर निघून गेले. जेव्हा ते चंद्रपूरच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रशासकीय इमारतीत पोहोचले तर त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अचानक झालेला आकस्मात मृत्यू म्हणून घोषित केलं, यामध्ये कुठलंही गुन्हेगारी कृत्य असल्याचं दिसून आलं नाही. त्यानंतर जयंत बल्लावर यांच्या मृत्यूची फाईल बंद झाली. पण तीन वर्षांनंतर जयंत बल्लावर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची स्वतःची मुलगी आणि तीन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तपासात पोलिसांनी अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. बल्लावर यांचा मृत्यू हा खरंतर पूर्वनियोजित खून असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आणि सगळ्यांचा थरकाप उडाला.
आर्या बल्लावर हीचं आशिष शेडमाके यांच्याशी २०२२ पासून प्रेमसंबंध होते. आर्याचे वडील पोलीस अधिकारी जयंत बल्लाकर यांचा आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाना विरोध होता. त्यामुळं प्रेमामध्ये अडथळा ठरत असल्यानं पोटच्या मुलीनं अर्थात आर्यानं वडिलांना ठार मारण्यचा प्लॅन बनवला. त्यानंतर आर्यानं तिचा चुलतभाऊ चैतन्य गेडाम (वय २२) याला बोलावून घेतलं आणि त्याला ५००० रुपये दिले आणि विष घेऊन यायला सांगितलं. याप्रकरणातील चौथा व्यक्ती जो अद्याप समोर आलेले नाही, तो म्हणून ज्यानं हे विष विकलं तो.
दरम्यान, २५ एप्रिल २०२३ रोजीच्या सकाळी आर्यानं आपल्या पोलीस अधिकारी असलेल्या आणि आपल्या प्रेमाला अडथळा ठरणाऱ्या वडिलांसाठी मिल्कशेक बनवला आणि त्यात विष टाकलं. हे मिल्कशेक पिऊन जयंत बल्लावर हे कामावर निघून गेले. जिल्हा कोर्टात त्यांची ड्युटी असल्यानं तिथं पोहोचल्यानंतर त्यांना आचनक चक्कर आली आणि ते खाली पडले त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथं त्यांचा मृत्यू झाला. सर्वांसमोर बल्लावर हे चालताबोलता पडले आणि गेले असा सर्वांचा समज झाला. त्यामुळं त्यांच्या शवविच्छेदनाची मागणीही कोणी केली नाही.
जयंत बल्लावर यांच्या निधनानंतर आर्या आणि आशिष यांनी लग्न केलं. आशिष गेडाम हा नुकताच पोलीस भरली झाला, पण बेशिस्त आणि घाणेरडी वागणूक असल्यानं त्याच्यावर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश निघाले. पण आर्याचं सासरी गेल्यानंतर नवरा आशिष सोबत भांडणं व्हायला लागली. त्यानंतर गेल्या आठवड्यात आशिष हा पोलीस ठाण्यात गेला आणि तिथं त्यानं सांगितलं की, आपल्या बोयकोनं अर्थात आर्यानं स्वतःच्याच वडिलांना कसं जीवे मारलं? हा व्यवस्थित रचलेलं कारस्थान होतं. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली यामध्ये आर्या बल्लाकर, तिचा पती आशिष शेडमाके, तिचा चुलभाऊ चैतन्य गेडाम आणि चौथा आरोपी ज्यानं विष पाजून ठार मारलं. या घटनेचा सविस्तर तपास पुढे चालूच राहणार आहे.
आशिष आणि आर्या यांचे २०२२ पासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्नही करायचं होतं, पण हे आर्याच्या वडिलांना मान्य नव्हतं. त्यांनी आशिषची सखोल चौकशी केल्यानंतर तो चांगला मुलगा नसल्याचं त्यांना कळालं होतं. त्यामुळं आपल्या मुलीचं आशिष गेडामसोबत लग्न होऊ नये अशी इच्छा होती. वडिलांनी मुलीला आशिषसोबत न जाण्यासाठी प्रवृत्त केलं. पण आर्यानं ऐकलं नाही उलट आपल्या प्रेमामध्ये वडील अडथळे ठरत असल्यानं त्यांनाच संपवण्याचा घाट आर्यानं घातला त्यानुसार तिनं विष घालून त्यांना मारलं. पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांचं ऑनड्युटी निधन झाल्यामुळं वारसदार मुलगी म्हणून आर्याला अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागेवर पोलीस कर्मचारी म्हणून निवड झाली. त्याचदरम्यान, आशिष देखील पोलीस खात्यात भरती झाला. त्यानंतर आर्या आणि आशिष यांनी लग्नही केलं.
पण एक-दोन वर्षातच दोघांमध्ये खटके उघडायला लागले. त्यामुळं वैतागलेल्या आशिषनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या पत्नीचा आजवर लपवलेला कारनामा कथन केला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.