Rohit Pawar: शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा डिझेलबाबतचा 'तो' आदेश अखेर रद्द; रोहित पवारांनी मानले आभार

Farmer Problem: शासनाच्या या निर्णयाबाबदल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
Indian Farmer
Indian Farmer
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा तो आदेश शासनानं अखेर रद्द केला आहे. शासनाच्या या निर्णयाबाबदल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे आभार मानले आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी ट्विट करुन सांगितलं. यासाठी रोहित पवार यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता.

Indian Farmer
Dhurandhar 2 : "'धुरंधर' पाहिलेले प्रेक्षक भाजपला मतदान करणारेत, त्यामुळं मी निश्चिंत"; मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान

नेमका विषय काय?

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल अन् एलपीजी गॅसच्या वितरणात अडथळे निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर कॅन किंवा ड्रममधून डिझेल विक्री करण्यावर सोलापूर जिल्हा प्रशासनानं २० मार्च २०२६ रोजी आदेशाद्वारे बंदी घातली होती. स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटर अशी यंत्रे शेतातच असल्यामुळं शेतकरी सहसा कॅन/ड्रममध्येच डिझेल घेऊन जातात. कामं थांबवून 10-15 किमीवर असलेल्या पंपावर ही यंत्रं न्यायला शेतकऱ्याला वेळेच्या आणि पैशांच्या दृष्टीनेही परवडत नाही. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांसाठीही काहीतरी मध्यम मार्ग काढावा, ही विनंती! अशा आशयाचं पत्र रोहित पवार यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहीलं होतं. पेट्रोल पंपावर कॅन/ड्रममध्ये डिझेल मिळणार नसल्याचे आदेश अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांकडून काढण्यात आले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दक्षता घेणं गरजेचं असलं तरी यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसताना दिसतोय, असंही रोहित पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

Indian Farmer
CM viral video : मुख्यमंत्र्यांना महिलेची भर कार्यक्रमात मिठी, जवळ ओढून घेतली पप्पी : व्हिडिओ तुफान व्हायरल

दरम्यान, रोहित पवारांच्या या पत्राची दखल घेत आणि इराणच्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून क्रूड ऑईल आणि गॅसचा पुरवठा वाढल्यानं आता सोलापूर जिल्हा प्रशासनानं कॅनमधून डिझेल वितरणावर घातलेली बंदी उठवली आहे. त्यामुळं रोहित पवारांनी या आदेशासाठी प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसंच इतर जिल्हा प्रशासनांनी देखील अशाच प्रकारे सकारात्मक निर्णय घ्यावेत, ही विनंती! अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

Indian Farmer
Ambadas Danve On Fuel : फडणवीस साहेब इंधन साठा पुरेसा आहे, तर मग देशात रांगा का? अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल!

शासनानं नेमकं काय म्हटलंय?

डिझेल कॅन किंवा ड्रममध्ये देण्यास बंदी घालणारा निर्णय मागे घ्यायच्या आदेशात म्हटलं की, सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात BPCL, IOCL, HPCL या कंपन्यांकडे पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं २० मार्च २०२६ रोजी काढलेला आदेश रद्द करण्यात येत आहे. याची तत्काळ प्रभावानं अंमलबजावणी करण्यात यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com