Amravati News Sarkarnama
विदर्भ

Amravati News : अयोध्येला जाल तर तुमचा अंत निश्चित; रुक्मिणी विदर्भ पीठाच्या महाराजांना जिवे मारण्याची धमकी

Jagadguru Ram Rajeshwaracharya Maharaj Threatened To Death : रुक्मिणी विदर्भ पीठाच्या महाराजांना धमकी कोणी दिली?

Amar Ghatare

Swami Ram Rajeshwaracharya Maharaj News :

रुक्मिणी विदर्भ पीठाचे जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना आज अज्ञातांकडून एका लिफाफ्यात चिठ्ठीद्वारे जिवे मारण्याची धमकी आली. याबाबत जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांकडून जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आज अनेक संघटनांच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. जगद्गुरु यांना तत्काळ प्रशासनाकडून पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अयोध्या येथे 22 तारखेला श्रीराम मंदिराचे लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणी विदर्भ पिठाचे पिठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. अयोध्येकडे जाण्याची पूर्ण तयारी सुरू असतानाच काल विदर्भ पीठावर एका लिफाफ्यामध्ये अज्ञातांकडून धमकीचे पत्र आले आहे.

तुम्ही मध्य प्रदेशमध्ये प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि आता अयोध्या अयोध्या करीत आहात. तुम्ही अयोध्येला जाल तर तुमचा अंत निश्चित आहे, अशी धमकी त्या निनावी चिठ्ठीतून देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विदर्भ पीठाकडून स्थानिक क़ुऱ्हा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जगद्गुरू राम राजेश्वराचार्य महाराज यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात जमले. विदर्भ पीठासोबतच जिल्ह्यातील विविध संघटनांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. महाराजांना तत्काळ पोलिस संरक्षण मिळावे, अशी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT