Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Akola News : दंगलीचा इतिहास असलेल्या मतदारसंघातून ठाकरेंना उमेदवारी द्या, पवार-पटोलेंना पत्र

Jagdish Patil

Akola News, 02 Oct : "दंगलीचा इतिहास असलेल्या अकोला शहरात उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिल्यास जातीय सलोखा निर्माण होईल त्यामुळे त्यांना अकोला पश्चिम मतदारसंघातून उभं करावं", अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे माजी नेते जावेद जकारिया यांनी महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) केली आहे.

यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. तर या पत्राला आघाडीतले नेते काय प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकांमधून निवडणूक जिंकली नाही. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी विधानपरिषदेवर आमदारकी मिळवली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस हे लोकनेते असून ते पाच वेळा आमदार म्हणून लोकांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे ठाकरेंनी लोकांमधून निवडून येऊन दाखवावं असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं होतं.

बावनकुळे यांनी आव्हान दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना थेट अकोला पश्चिम मतदारसंघातून उभं करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे माजी नेते जावेद जकारिया (Javed Zakaria) यांनी केली आहे. यासाठी त्यांनी आघाडीतील प्रमुख नेत्यांना पत्र लिहलं आहे. शिवाय ते या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने वियजी होतील असा दावाही त्यांनी केला आहे.

ठाकरे विजयी होतील

जावेद जकारिया म्हणाले की, "उद्धव ठाकरे अकोला (Akola) पश्चिम मतदारसंघातून उभे राहिले तर इथले मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. दंगलीचा इतिहास असलेल्या अकोला शहरात ठाकरेंच्या उमेदवारीने जातीय सलोखा निर्माण होईल."

त्यामुळे आता जकारिया यांच्या मागणीवर आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मागील 30 वर्षांपासून अकोला पश्चिम मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिल्यास इथलं राजकीय समीकरण बदलणार का? अशा चर्चा सुरू आहेत.

जावेद जकारिया कोण आहेत?

जावेद जकारिया हे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नेते आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT