Ladaki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये, पितळाचे दोन हंडे; CM शिंदेंच्या डोळ्यात टचकन आलं पाणी

CM Eknath Shinde On Ladaki Bahin Yojana : धुळ्यातील एका महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या 4500 रुपयांतून दोन पितळाचे हंडे विकत घेतले आणि त्या हंड्यावर भावाकडून सप्रेम भेट म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव टाकलं आहे.
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana, CM Eknath Shinde
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana, CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 02 Oct : धुळ्यातील एका महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून (Ladaki Bahin Yojana) मिळालेल्या 4500 रुपयांतून दोन पितळाचे हंडे विकत घेतले आणि त्या हंड्यावर भावाकडून सप्रेम भेट म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव टाकलं आहे.

या घटनेचा व्हिडीओ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत महिलेने हंड्यांवर भावाकडून सप्रेम भेट म्हणून माझे नाव टाकले. ते पाहून डोळ्यात पाणी आल्याचं म्हटलं आहे.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. एकीकडे सत्ताधारी या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना आम्ही मदत करत असल्याचा दावा करत आहेत. तर विरोधक ही योजना म्हणजे केवळ निवडणुकीसाठीचा (Election) जुमला असून त्यानंतर ही योजना बंद होणार असल्याची टीका करत आहेत. त्यामुळे या योजनेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana, CM Eknath Shinde
Pune Politics : भाजपने पुण्यातील 2 मतदारसंघावरील दावा सोडला, इच्छुकांचं काय होणार?

अशातच आता एका महिलेने लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या 4500 रुपयांतून दोन पितळाचे हंडे विकत घेऊन त्यावर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचं नाव टाकल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महिलांना या योजनेच्या पैशांचा उपयोग होत असल्याचं म्हटलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की, "1500 रुपयांत काय होते, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी आमच्या बहिणींना मायेची भेट देण्याचे समाधानच इतके मोठे होते की क्षुल्लक टीका आम्ही नजरेआड केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आजवर मनाला मुरड घालत असलेल्या आवडीच्या गोष्टी कुणी घेतल्या, कुणी छोटेखानी व्यवसाय केला.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana, CM Eknath Shinde
Vinesh Phogat : पंतप्रधान मोदींचा फोन आला होता, पण ‘त्या’ अटीमुळे बोलण्यास नकार दिला! विनेश फोगाटचा गौप्यस्फोट

आम्ही देत असलेली ओवाळणी बहिणी प्रेमाने स्वीकारत आहेत, यातच आमचा आनंद आहे. धुळ्यातील एका भगिनीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या 4500 रुपयांतून पितळ्याचे दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर भावाकडून सप्रेम भेट म्हणून माझे नाव टाकले. ते पाहूनही आनंदाश्रू तरळले.

आमची प्रामाणिक भावना या भगिनींपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आणि आमच्या नात्यात मायेची गुंफण होतेय, यापेक्षा आणखी काय हवे? लाडक्या बहिणींचा विश्वास, माया ही मुख्यमंत्री आणि भाऊ म्हणून मला मिळालेली आजवरची सर्वांत मोठी आणि मौल्यवान भेट आहे," अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com