Eknath Shinde-Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Shinde Vs Thackeray : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; ‘आमदारकी वाचविण्यासाठी काही लोक पर्यटनासारखे अधिवेशनाला येतात’

Assembly Winter Session : महायुती सरकारने आपला शब्द पाळला. मंत्रिमंडळ विस्तार, विधान परिषदेच्या सभापतीची निवडही केली. पुणे विमानतळाला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव देऊन तशी शिफारस आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Nagpur, 21 December : काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा आमदारकीचाही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. पण तीच आमदारकी वाचविण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात. त्यांनी हे अधिवेशन विनोदी आहे, असं म्हणणं म्हणजेच मोठा विनोद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, असे काही लोक म्हणाले होते. तसेच, हे अधिवशेन विनोदी असल्याची टीकाही काही लोक करून गेले. पण, काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं. पण, तीच आमदारकी वाचविण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात. त्यांनी हे अधिवेशन विनोदी आहे, असं म्हणणं म्हणजेच मोठा विनोद आहे.

महायुती सरकारने आपला शब्द पाळला. मंत्रिमंडळ विस्तार, विधान परिषदेच्या सभापतीची निवडही केली. पुणे विमानतळाला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव देऊन तशी शिफारस आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, अधिवेशन विदर्भात होत असताना विरोधी पक्षाने विदर्भाचे प्रश्न उपस्थित करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी विदर्भाचे प्रश्न मांडण्याऐवजी सभागृहाच्या पायऱ्यांवर आणि प्रसार माध्यमांसमोर सर्वाधिक वेळ घालवला. आम्ही सरकार म्हणून विरोधकांनाही मानसन्मान दिला आहे.

विरोधी पक्षाने ज्या प्रमाणे पूर्वी अडीच वर्षे पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी आणि आरोप केले. पण, आम्ही विरोधकांच्या आरोपांना उत्तर न देता काम करून दाखवलं. काम कसं करायचं हे आम्ही दाखवून दिलं, त्यामुळे आरोप करणारे, शिव्या देणाऱ्यांना लोकांनी घरी बसवले.

आगामी काळात आमचा महाराष्ट्राच्या विकासावर फोकस असणार आहे. तसेच, कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या संपर्कात आहेत, कांद्यावरील निर्यातमूल्य २० टक्के कमी करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्यालाही लवकरच यश येईल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT