Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडणार वर्षा बंगला; कोणता नवा बंगला मिळणार?

Mahayuti Government : फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांना नंदनवन बंगला देण्यात आलेला आहे. त्या बंगल्याची सध्या डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर शिंदे हे नंदनवन या बंगल्यात राहायला जाणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 14 December : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा (Varsha) हे शासकीय निवासस्थान सोडावे लागणार आहे. शिंदे हे लवकरच वर्षा बंगल्यावरून शेजारच्या मुक्तगिरी बंगल्यावर राहायला जाणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासूनच शिंदे यांचे ‘वर्षा’वरील साहित्य हलवायला सुरुवात केली आहे.

नागपुरातील राजभवनात उद्या (रविवारी, ता. 15 डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. तत्पूर्वीच मुंबईत आज महत्वपूर्ण घडामोडींना वेग आला आहे. मंत्र्यांच्या बंगल्याची आदलाबदल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षा सोडून शेजारच्या मुक्तगिरी बंगल्यात राहायला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांना नंदनवन बंगला देण्यात आलेला आहे. त्या बंगल्याची सध्या डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर शिंदे हे नंदनवन या बंगल्यात राहायला जाणार आहेत.

Eknath Shinde
Subhash Deshmukh : मला विधानसभा लढवायची नव्हती; सुभाष देशमुखांनी सांगितला निवडणुकीपूर्वीचा घटनाक्रम

महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा नुकताच शपथविधी झाला आहे. मुख्यमंत्रिपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला शिंदे यांना सोडावा लागणार आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचा निवास असतो, त्यानुसार वर्षा बंगला हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे येणार आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगला सोडावा लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांना नंदनवन हे शासकीय निवासस्थान देण्यात आलेले आहे. मात्र, त्या बंगल्याची सध्या डागडुजी करण्यात येत आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर शिंदे यांना नंदनवन हा बंगला देण्यात येणार आहे. तत्पूर्वीच शिंदे यांनी वर्षा बंगल्यावरून साहित्य हलावायला सुरुवात केली आहे. वर्षा बंगल्याच्या शेजारी असलेल्या माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तगिरी या बंगल्यात साहित्य शिफ्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

Eknath Shinde
Cabinet Expansion : महायुतीचे 35 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ; तीनही पक्षांची संभाव्य यादी पाहा

देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वर्षा बंगला सोडायला एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली आहे. शिंदे यांनी आपले साहित्य शेजारच्या मुक्तगिरी बंगल्यात दाखल करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार वर्षा बंगला लवकरच फडणवीस यांच्याकडे येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com