Ashish Deshmukh, Anil Deshmukh, Salil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Salil Deshmukh : अनिल देशमुखांवर केलेली टीका जिव्हारी; मुलगा सलील अन् पुतण्या आशिष भावंडांमध्ये शीतयुद्ध

Jagdish Patil

Salil Deshmukh On Ashish Deshmukh : सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कुटुंबातील राजकीय आरोप-प्रत्यारोप टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्यावर त्यांचे पुतणे आणि भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलेल्या टीकेला आता अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"काचेच्या घरात तुम्ही राहता, तुमच्या घरी सख्खा भाऊ राहत नाही, तुम्ही काय काचेच्या घरावर बोलणार? ज्याचे केस खोटे ते काय दुसऱ्याला फॅशनेबल म्हणणार, 'तेरे बाल भी नकली और तेरी चाल भी नकली," अशी बोचरी टीका सलील यांनी आशिष देशमुख यांच्यावर केली आहे. त्यामुळे आता देशमुख विरुद्ध देशमुख वाद विकोपाला गेल्याचं दिसत आहे.

आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सलील म्हणाले, "आशिष देशमुख माकड असून ते कुठेही उड्या मारतात. 2014 मध्ये ते चुकून निवडून आले. त्यांना कोणी उत्तर द्यायची गरज नाही. काचेच्या घरात ते राहतात, तुमच्या घरी सख्खा भाऊ राहत नाही, तुम्ही काय काचेच्या घरावर बोलणार. ज्याचे केस खोटे ते काय दुसऱ्याला फॅशनेबल म्हणणार? 'तेरे बाल भी नकली और तेरी चाल भी नकली," अशा शब्दात सलील यांनी आशिष देशमुखांवर टीका केली.

तसंच आशिष देशमुख हे प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात, त्यांना आचार नाही, त्यांना विचार नाही. मागच्या 2 विधानसभा निवडणुकीत त्यांना वडिलांच्या पुण्याईने मते मिळाली होती. आता तीही मिळणार नाहीत. आता घरचे लोक देखील त्यांना सिरियस घेत नाहीत, त्यांना आपण काय सिरियस घेणार, असं म्हणत सलील देशमुखांनी आशिष देशमुखांवर हल्लाबोल केला.

आशिष देशमुख नेमकं काय म्हणाले?

भाजप नेते आशिष देशमुख यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर टीका करताना म्हणाले की, अनिल देशमुखांनी आपल्या मतदारसंघात काहीच कामे केली नाहीत. तर आता त्यांना भाजप विरोधात निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोटे आरोप केले.

शिवाय अनिल देशमुख माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. म्हणून मला त्यांची चिंता आहे. मात्र काकांनी लक्षात ठेवावे, जे स्वतः काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्याच्या घराला दगड मारत नाही. असा टोलाही त्यांनी अनिल देशमुखांना लगावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT