Devendra Fadanvis :  Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadanvis : फडणवीसांना चढला पुष्पा फिव्हर; म्हणाले, तेरी नजर अशर्फी श्रीवल्ली... (पाहा व्हिडिओ)

अनुराधा धावडे

Nagpur Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांची गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असतात, पण खुद्द देवेंद्र फडणवीसही गातात आणि त्यांना गाताना तुम्ही पाहिले आहे का, असा सवाल तुम्हाला विचारला तर तुम्ही छे काहीतरी, पण आहो हे खरं आहे.

महिनोन महिने राजकारण, राजकीय खेळ्या, टीका टिप्पणी, आरोप-प्रत्यारोपांच्या धबडग्यात असलेली एखादी व्यक्ती गाऊ शकते असे तुम्हाला सांगितले तर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण खरंच, देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) गातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

नागपूरचे उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाचा रिसेप्शन कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब उपस्थित होते. या ठिकाणी गायक जावेद अली हेदेखील होते. 'पुष्पा-द राईज' या दाक्षिणात्य चित्रपटाने गेल्या वर्षीपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यातील गाणीही सुपर डुपर हिट ठरली. जावेद अली याच चित्रपटातील 'श्रीवल्ली..' गाणे गात होते. त्यांनी फडणवीसांनाही श्रीवल्ली गाणे गाण्याचा आग्रह धरला आणि फडणवीसांनाही त्याला त्याच जोमाने प्रतिसाद देऊन 'तेरी झलक अशर्फी श्रीवल्ली....' गाण्यास सुरुवात केली. त्यांचे गाणे ऐकताच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंडळींनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गाण्याला दाद दिली.

त्यानंतर जावेद अली शेजारी बसलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे गेले आणि त्यांनाही दोन ओळी गाण्यास सांगितले. गडकरींनी 'तुझसे नाराज नही जिंदगी' हे गाणे गायले, त्यांच्याही गाण्याला उपस्थितांनी दाद दिली. फडणवीस आणि गडकरी यांच्या गाण्यामुळे कार्यक्रमाला एकच रंगत आली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT