Supriya Sule Meet Ajit Pawar : सुप्रिया सुळे घेणार अजितदादांची भेट; म्हणाल्या, "रोजच चौकशी करते, भाऊ आहे माझा..."

Supriya Sule Meet with Ajit Pawar News : "महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही..."
Supriya Sule Meet with Ajit Pawar News
Supriya Sule Meet with Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे या लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांचे बंधू अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील चार पाच दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. सध्या ते आजारातून बरे होण्याच्या दृष्टीने विश्रांती घेत आहेत. दरम्यान, आता सुप्रिया सुळे अजितदादांना भेटणार आहेत, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना इच्छा व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule Meet with Ajit Pawar News
BJP Loksabha News : मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार गट गाफील, भाजप झाला सक्रिय!

अजितदादांबद्दल प्रश्न विचारल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांना भेटणार असल्याचे म्हटले आहे. "डेंग्यू आजार झाल्यावर माणसाने आराम करायचा असतो. अजितदादांना आरामाची गरज आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न असताना त्यात राजकारण आणणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. ते बरं झाल्यावर मी त्यांना भेटायला जाणार आहे. दादांची मी रोज चौकशी करते, अजितदादा भाऊ आहे माझा," असे सुळे म्हणाल्या.

Supriya Sule Meet with Ajit Pawar News
Supriya Sule : ''सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर...'', सुप्रिया सुळेंकडून पुन्हा एकदा फडणवीस लक्ष्य!
Supriya Sule Meet with Ajit Pawar News
Ajit Pawar infected with Dengue : अजित पवारांना डेंग्यूची लागण : डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

अजित पवार मागील चार-पाच दिवस आजारामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिले नाहीत. त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. अजूनही पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून सांगितले होते की, "अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली की, ते संपूर्ण ताकदीनिशी जनतेच्या सेवेत दाखल होतील," असे त्यांनी ट्विट केले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com