Nagpur ST
Nagpur ST Sarkarnama
विदर्भ

Nagpur : एसटी जाहिरात : फुकट्यांवर आता थेट गुन्हे दाखल होणार !

Atul Mehere, aswin@quintype.com

अखिलेश गणवीर

नागपूर : एसटी बसवर अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यां विरोधात कारवाई करण्यात येणार असून अवैधपणे जाहिरात लावणाऱ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राची ‘जीवनवाहिनी’ वाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST)ने ‘गाव तिथे एसटी’ ची संकल्पना राबविली. त्यामुळे नागपूर (Nagpur) शहरातील मार्गांसह प्रत्येक गावखेड्यांत एसटी पोहोचते. एसटीवर जाहिरात, पॉम्प्लेट्स, स्टिकर अनधिकृतपणे लावले जातात. लवकर व फुकटात लोकांपर्यंत पोहोचता येत असल्याने अशा जाहिराती लावणाऱ्यांचे चांगलेच फावते. पण यावर आता आळा घातला जाणार आहे. तोट्यातील एसटी नफ्यात यावी म्हणून महामंडळाकडून (ST Corporation) विविध उपक्रम राबविले जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलती दिल्या जात आहेत.

राज्यातील (Maharashtra) प्रत्येक गावात एसटी पोहोचत असल्याने जाहिराती चिकटवणाऱ्यांना जाहिरातीतून फायदा होतो. व्यापारी व संस्था जाहिरात व्हावी म्हणून अनधिकृतपणे एसटीच्या आतील भागात, सीटवर बाह्य भागात पॉम्प्लेट्स, स्टिकर किंवा जाहिराती चिकटवितात. बस स्थानकावर अशीच परिस्थिती आहे. बस स्थानकाच्या भिंतीवर व इतर ठिकाणी अशा अनधिकृत जाहिराती लावल्या जातात. महामंडळाचे कर्मचारी त्या काढून टाकतात.

पण आता जाहिरातीतून उत्पन्न व्हावे म्हणून महामंडळाने अधिकृत एजन्सीची नेमणूक केली आहे. त्या माध्यमातून आलेली जाहिरात महामंडळ अधिकृतपणे गृहीत धरते. आता अशा जाहिराती आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. जाहिरात लावणाऱ्या जबाबदार व्यक्तीवर जाहिरातीच्या स्वरूपानुसार दंडही आकारला जाणार आहे. नागपूर विभागात महामंडळाने या संदर्भात कडक पवित्रा घेतला आहे. अशा जाहिराती आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महामंडळाकडून देण्यात आला आहे.

एसटी महामंडळाने जाहिरातीकरिता अधिकृत एजन्सीची नेमणूक केली आहे. त्या माध्यमातून आम्ही जाहिराती लावतो. मात्र, अनधिकृत जाहिराती लावल्यास आम्ही लगेच काढून टाकतो. आता असे आढळल्यास संबंधित जबाबदार लोकांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार त्याच बरोबर दंड सुद्धा वसूल केला जाईल.

श्रीकांत गभने, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ (नागपूर विभाग)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT