ऐका हो ऐका! एसटी महामंडळ चार वर्षात येणार नफ्यात; असा आहे प्लॅन

समितीनं विलीनीकरणाची मागणी फेटाळली आहे. पण समितीच्या याच अहवालात एसटी पुढील चार वर्षात नफ्यात येणार असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.
MSRTC | ST Employees Strike | ST Employees strike News updates |ST Master Plan
MSRTC | ST Employees Strike | ST Employees strike News updates |ST Master PlanSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एसटी महामंडळाच्या (MSRTC) विलीनीकरणाचा मुद्दा अजूनही गाजत आहे. विलीनीकरणाबाबत विचार कऱण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल बुधवारी मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत तर शुक्रवारी विधीमंडळात सादर करण्यात आला. समितीनं विलीनीकरणाची मागणी फेटाळली आहे. पण समितीच्या याच अहवालात एसटी पुढील चार वर्षात नफ्यात येणार असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. त्यासाठीचा महामंडळाचा संपूर्ण प्लॅन अहवाल देण्यात आला आहे. (MSRTC Latest News Updates)

विलीनीकरणाचा विचार करताना समितीने एसटी महामंडळाकडून सक्षमीकरणासाठी कालबध्द कार्यक्रम घेतला होता. सध्याची महामंडळाची आर्थिक स्थिती व तोटा लक्षात घेता काही कालावधीसाठीचा खर्च स्वत:च्या उत्पन्नातून भागविणे एसटीला शक्य नाही. मागील अनेक वर्षांपासून एसटी सातत्याने तोटा सहन करत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळ आणखी भरडलं आहे. याअनुषंगाने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी पुनरुज्जीवन करण्यासाटीचा आराखडा समितीला सादर केला. (ST Employees Strike)

MSRTC | ST Employees Strike | ST Employees strike News updates |ST Master Plan
विलीनीकरण फेटाळलं पण एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी शिफारस

असा आहे एसटीचा प्लॅन...

महामंडळ हे त्यांच्या स्वत:च्या डिझेल बसेसचे सीएनजी व एलएनजी वर चालणाऱ्या बसेसमध्ये रुपांतरण करणार आहे. त्याचप्रमाणे नवीन खरेदी करावयाच्या बसेस या सीएनजीवर चालणाऱ्या खरेदी करण्याचेही नियोजन आहे. यासोबत डिझेल तसेच सीएनजीवर चालणाऱ्या बसेस भाडेतत्वावर घेऊन महामंडळाच्या बसेसच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढविण्याचे महामंडळाचे नियोजन असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

याशिवाय इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणात भाडेत्वावर संपादित करण्याचेही नियोजन आहे. सन 2026-27 पर्यंत 5 हजार 300 इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस भाडेत्वावर घेण्यात येतील, असे महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे. याशिवाय डिझेल इंधनावर चालणाऱ्या एक हजार बसेस व सीएनजीवर चालणाऱ्या 700 बसेससुध्दा 2026-27 अखेरपर्यंत भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारे महामंडलाच्या एकूण वाहन ताफ्यापैकी 35 टक्के बसेस या भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. सध्या असलेल्या 17 हजार 239 वाहनांमध्ये वाढ करून सीएनजी, एलएनजी व इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढवल्यामुळे सुध्दा महामंडळाच्या इंधन खर्चात बचत होणार आहे.

MSRTC | ST Employees Strike | ST Employees strike News updates |ST Master Plan
विमानात नवीनच्या मृतदेहाला जास्त जागा लागेल; भाजप आमदारानं जखमेवर चोळलं मीठ

महामंडळाच्या सार्थ किमीमध्ये वाढ करून सध्याच्या 184 कोटी कमीवरून 2026-27 पर्यंत सुमारे 234.13 कोटी कमी इतकी वाहतूक करण्याचे नियोजन असल्याने उत्पन्नात भर पडणार आहे. याशिवाय मालवाहतूकीव्दारेसुध्दा अधिकचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. अशाप्रकारे उपाययोजना राबविल्याने वर्ष 2026-27 पासून महामंडळास नफा होईल, अशी महामंडळाची अपेक्षा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

उत्पन्नात वाढीच्या योजना -

- मालवाहतूकीद्वारे अतिरिक्त महसूल मिळवणे, 25 टक्के शासकीय माल वाहतूक महामंडळामार्फत करणे

- महामंडळाच्या जागा बांधा, वापरा व हस्तांतर करण्याच्या तत्वावर विकसित करणे

- एसटीच्या प्रवासी वाहनांतून पार्सल सेवा अधिक सक्षणपणे राबवणे

- पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांचे किरकोळ विक्री केंद्रे महामंडळामार्फत चालवणे

- शासकीय वाहनांची दुरूस्ती महामंडळाच्या कार्यशाळांमार्फत करणे व शासकीय वाहनांचे टायर पुन:स्तरीकरण करणे

- डिझेल बसेसचे सीएनजी व एलएनजीमध्ये परिवर्तन करणे

- नवीन बसेस खरेदी करताना सीएनजीला प्राधान्य

- महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणणे

- महामंडळाचा बस स्टाफ रेशो कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना अंमलात आणणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com