Bhagyashree Atram vs Dharmarav Baba Atram  Sarkarnama
विदर्भ

Video Pawar Vs Pawar : कन्या म्हणते 'ते शेर तर मी पण शेरणी!'

Bhagyashree Atram vs Dharmarav Baba Atram : धर्मराव बाबा आत्राम शेर असतील तर मी शेरणी आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना धमकी देऊ नका असा इशाराही त्यांनी यावेळी आपल्या वडिलांना दिला.

Rajesh Charpe

Nagpur News : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी आज अधिकृतपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्या काय बोलतात,काय भूमिका जाहीर करतात याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. भाग्यश्री यांनीसुद्धा मोकळेपणाने वडिलांना का सोडले याची माहिती दिली. 'धर्मराव बाबा आत्राम शेर असतील तर मी शेरणी आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना धमकी देऊ नका', असा इशाराही त्यांनी यावेळी आपल्या वडिलांना दिला.

भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांना अहेरी विधानसभा मतदारसंघतून विधानसभेची निवडणूक लढायची आहे. यावरून बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यात वाद सुरू होता. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी आई-वडिलांना चरण स्पर्श करून आपल्या भाषणाला सुरुवात केली.

इतक्या वर्षांपासून धर्मराव बाबा आत्राम (Dharmrao baba Atram) अहेरी जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. मात्र ते मतदारसंघात कधीच फिरकत नाही. येतात आणि निघून जातात. निवडणूक प्रचाराच्यावेळी मला गर गर फिरवले आणि विधानसभा निवडणुकीचे गाजर दाखवले. मतदारसंघात रस्ते नाहीत. युवकांना रोजगार नाही. आता सूरजागड इस्पातमध्ये स्थानिक युवकांना नोकरीचे गाजर दाखवले जात आहे. ही कंपनीच बोगस आहे. इंदौरमधील चिटफंड घोटाळ्यातील लोकांना कंपनीचे संचालक करण्यात आले आहे. ही फक्त निवडणुकीसाठी स्टंट आहे. कोणालाही रोजगार मिळणार नाही. आदिवासी युवकांच्या हाती काठ्या देऊन त्यांना सुरक्षा रक्षक केले जाणार आहे. नोकऱ्याच द्यायच्या होत्या तर त्यांनी सूरजागढ खाणीत का दिल्या नाही असा सवाल त्यांनी केला. माझे काम सर्वांना माहिती आहे. मला एक संधी द्या. त्या संधीचे सोने करून दाखवेल.

दादांनी चूक सुधारावी

अजित दादा गडचिरोलीत आले होते. तेव्हा त्यांनी मी चूक केली ती तुम्ही करू नका, घर फोडू नका अशी विनंती केली होती. आता मला त्यांना विचायराचे आहे, शरद पवार यांना सोडून जाताना त्यांनी हा विचार का केला नाही. झालेली चूक त्यांनी मान्य केली. त्यामुळे त्यांनी ती ता सुधारावी आणि परत शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे यावे. मी आता डिसिजन घेतले आहे. आपल्या भूमिकेवर कायम राहणार आहे. सर्व गावाला ठावूक आहे मी कसे काम करतो. माझ्याकडे घरदार नाही. मात्र चिंता नाही. संपूर्ण अहेरी हेच माझे घर आहे. मी कोणाकडेही जाऊन राहू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT