Jayant Patil : अजितदादांच्या मंत्र्याच्या घरात फूट पडणार? जयंत पाटील स्पष्टच बोलले

NCP Sharad Pawar Jayant Patal Dharamrao baba Aatram Ajit Pawar : रोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे, असा आरोप धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.
Jayant Patal
Jayant Patal sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jayant Patal News : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम-हुलगेकर या धर्मरावबाबा यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे, असा आरोप धर्मरावबाबा आत्राम यांनी केला होता. यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'धर्मरावबाबा अत्राम हे लोकसभेत जाणार होते आणि त्यानंतर त्यांची मुलगी विधानसभा लढणार होती, अशी चर्चा अगोदरच होती. पण धर्मरावबाबा अत्राम हे काही खासदार झाले नाही. त्यामुळे हा प्रॉब्लम झाला आहे.', असे जयंत पाटील म्हणाले.

भाग्यश्री विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्या शरद पवार गटात जाणार असल्याचाही चर्चा आहेत. जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घरात फूट पाडू नका. मी ती अनुभवली आहे. माझी चूक झाली, असा सल्ला भाग्यश्री यांना देत धर्मरावबाबा आत्राम यांची साथ न सोडण्याचे आव्हान अजित पवारांनी केले.

Jayant Patal
Video Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारचा दणका

घरात फूट पडण्यावरून चूक झाल्याची कबुली अजित पवारांनी दिली. त्यावर जयंत पाटील म्हणाले, गडचिरोलीमध्ये त्यांनी वक्तव्य करुन त्यांनी बाबा अत्राम आणि त्यांच्या मुलीला घरात फूट पडू नये, असा संदेश दिला. त्यांना काही पश्चाताप झाला असेल याबद्दल मला माहीत नाही.

अजितदादांना बाहेर काढण्याचा प्लॅन

मंत्री गुलाब पाटील यांनी अजितदादांच्या खात्यावर जहरी टीका केली होती. त्यावर जयंत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी अशी टीका करणे योग्य नाही. पण अशी टीका करुन महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढून शिवसेनाला जास्त जागा महायुतीमध्ये मिळाव्यात असा काही त्यांचा प्लॅन असेल.

Jayant Patal
Samarjitsingh Ghatge : शरद पवारांच्या शिलेदाराने घेतली राजू शेट्टींची भेट, राज्यात नवीन राजकीय समीकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com