Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
विदर्भ

BJP setback : राज्यात सुसाट इनकमिंग पण बावनकुळेंच्या जिल्ह्यातच भाजपला मोठे खिंडार; 18 बंडखोरांनी हाती घेतला धनुष्यबाण

Political News : भाजपचे नेते आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : भाजपचे नेते आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये मोठे खिंडार पडले आहे. उमरेड नगर परिषदेसाठी उमेदवार दाखल करायच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रात्री बारा वाजता पक्षात प्रवेश देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे येथे मोठा असंतोष उफाळून आला आहे.

उमरेड नगर परिषदेत नाराज झालेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप सोनटक्के यांच्या नेतृत्वात पाच माजी नगरसेवकांसह सर्वांनी शिंदे सेनेचे धनुष्यबाण हाती घेऊन आपली दावेदारी दाखल केली आहे. सेनेने दिलीप सोनटक्के यांच्या पत्नी शालीन सोनटक्के यांना नगराध्यक्षपदासाठी उभे केले आहे. आता त्यांची लढत भाजपच्या उमेदवार प्राजक्ता कारू आणि काँग्रेसच्या सुरेखा रेवतकर यांच्याशी होणार आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawnakule) यांनी सर्व बंडखोरांची समजूत काढू, त्यांना माघार घ्यायला लावू असे सांगितले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बंडखोरांनी माघार घेतल्याचे दिसेल असा दावा केला आहे. मात्र शिंदे सेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या भाजपच्या बंडखोरांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नाही असे ठामपणे सांगितले.

या सर्वांचा रोष भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद राऊत आणि माजी आमदार राजू पारवे यांच्यावर आहे. दोघांनी तिकीट विकल्याचा त्यांचा आरोप आहे. आम्ही पाच वर्ष नगरसेवक होतो. काँग्रेसमधून आयात केलेल्यांना तिकिटे द्यायचा असल्याने आम्हाला डावलण्यात आल्याचा आरोप चार नगरसेवकांनी केला आहे.

गेल्या निवडणुकीत आम्ही भाजपला (BJP) विजयी केले होते. मात्र, पैशासमोर आता भाजपचा कार्यकर्ता कमी पडला. कुठलेही कारण नसताना त्यांचे तिकीट कापण्यात आले. सर्वे केला असे सांगण्यात येते. मात्र कोणी सर्वे केला, कुठे केला आणि कोणाशी बोलले याचा तपशील आम्हाला द्यावा अशी मागणी माजी नगरसेवकांनी भाजपच्या नेतृत्वाकडे केली आहे.

आम्ही बंडखोरी केली नाही तर भाजपच्या जिल्ह्यातील दोन नेत्यांनी ती आम्हाला करायला लावली. आम्हाला पक्ष सोडण्यासाठी मजबूर करण्यात आले. 27 सदस्यांच्या उमरेड नगर परिषदेत भाजपच्या 20 जणांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. आम्ही सर्व ताकदीने लढू आणि भाजपच्या दोन नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही दिलीप सोनटक्के यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT