NCP Politics : प्रदीप गारटकरांनी जमवलेली गट्टी दत्तामामा भरणेंना जड जाणार? इंदापुरात अजितदादा अधिक लक्ष घालणार!

Indapur municipal election : इंदापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या संख्येत यंदा तीनने वाढ झाली असून, दहा प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठीही १०० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
Ajit Pawar, Dattatray Bharne, Pradip Gartkar
Pradip Gartkar discussing strategy with supporters during the Indapur election campaign, highlighting the growing political rivalry in the region.Sarkarnama
Published on
Updated on

Indapur News, 19 Nov : इंदापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व कृष्णा भीमा विकास आघाडी, अशी मुख्य लढत होणार आहे. यात नगराध्यक्षपदासाठी भरत शहा विरुद्ध प्रदीप गारटकर ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

शहा यांच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ असणार आहे. तर, गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे प्रवीण माने यांना एकत्र आणत विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे.

पण या बदलेल्या समीकरणांमुळे अजित पवारांनी नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी इंदापूरमध्ये लक्ष वाढवल्याची चर्चा आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी राखीव झाले आणि अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्या. नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले भरत शहा यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याबाबत हालचाली सुरू केल्या.

मात्र, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध न करता थेट नगराध्यक्ष उमेदवारी देण्यास विरोध केला. पण अजित पवार व दत्तात्रेय भरणे यांनी हा विरोध डावलून शहा यांना पक्षात प्रवेश देत थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली.

नाराज झालेल्या गारटकर यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. त्यानुसार त्यांनी कृष्णा भीमा आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण केले.

Ajit Pawar, Dattatray Bharne, Pradip Gartkar
Angar Election: अजितदादांचा एकेरी उल्लेख रोहित पवारांच्या जिव्हारी; थेट बाळराजे पाटलांच्या वडिलांना म्हणाले, 'चिरंजीवांना म्हणावं थोडं दमानं, सत्तेची मस्ती...'

इंदापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या संख्येत यंदा तीनने वाढ झाली असून, दहा प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठीही १०० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

दरम्यान २०१६–१७ च्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. त्यावेळी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर अंकिता शहा यांनी राष्ट्रवादीच्या अनुराधा गारटकर यांचा पराभव करत नगराध्यक्षपद मिळवले होते. मात्र, नऊ नगरसेवक राष्ट्रवादीचे, तर आठ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते.

Ajit Pawar, Dattatray Bharne, Pradip Gartkar
Angar Election update : उज्ज्वला थिटेंचा मुलगाच होता सूचक, टॅक्टिक वापरून सही केली गायब; अजितदादांच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, भरत शहा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय संघर्ष निर्माण झाल्यामुळे शहरातील राजकारणाचे गणित वेगळे बनले. आता शहा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांना कुटुंबातील नगराध्यक्षपदाच्या कामाचा अनुभव असून, आता त्यांना अजित पवार व दत्तात्रेय भरणे यांची मिळालेली साथ, ही त्यांची जमेची बाजू आहे.

तर, गारटकर यांनीही यापूर्वी नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यांचे संघटन कौशल्य मोठे आहे. त्यातच यंदा त्यांना पारंपारिक विरोधक असलेल्या हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे इंदापूर नगर परिषदेची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com