Sudhir Mungantiwar : नागपूर : हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापूढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये (State government) अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली.
मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्कृतिक खात्याची जवाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसुन भारतीयांच्या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्याकाळात स्वातंत्र्यासाठी लढणा-यांना उर्जा देण्याचे काम करत होते.
'हे माते मी तुला प्रणाम करतो' अशी भावना व्यक्त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापूढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरु करणार आहोत. १८०० मध्ये टेलिफोन अस्तीत्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरु करत आलो आहोत. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. सांस्कृतिक कार्या विभागातर्फे याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वने, मत्स्यव्यवसाय आणि सांस्कृतिक कार्य मंत्री खात्याचा कारभार सोपवण्यात आला. खातेवाटप होताच सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठी घोषणा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.