Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar News : सुधीर मुनगंटीवार लंडनमध्ये विशेष पोषाख घालून करणार एमओयू !

Chhatrapati Shivaji Maharaj : महाराज जसा पोषाख घालायचे, तसाच पोषाख ते तयार करून देणार आहेत.

संदीप रायपूरे


Chandrapur Political News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा अतिशय भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. हिंदवी स्वराज्याची निर्मिती करताना ज्या वाघनखांनी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला. ती वाघनखं आता महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. (They are going to prepare the same clothes as Maharaj used to wear)

यासंदर्भात आज (ता. ३०) राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुण्यातील रॉयल ट्विस्ट प्रतिष्ठानच्या संचालक, जे शिवभक्त आहेत त्यांनी माझ्यासाठी एक विशेष पोषाख तयार केला आहे. वाघनखांसाठी एमओयू करण्यासाठी जेव्हा मी जाणार, तेव्हा तो पोषाख मी परिधान करावा, अशी त्यांची इच्छा आहे. विशेष म्हणजे त्या पोषाखासाठी मी त्यांना पैसे देऊ केले, तेव्हा त्यांनी ते घेण्यास नकार दिला.

रॉयल ट्विस्टचे संचालक म्हणाले की, महाराजांसाठी ही माझी सेवा आहे. याशिवाय महाराज जसा पोषाख घालायचे, तसाच पोषाख ते तयार करून देणार आहेत आणि तो पोषाख लंडनच्या म्युझियममध्ये ठेवायचा आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सध्या ही वाघनखं लंडनमधील म्युझियममध्ये आहेत. वाघनखं आणण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील तीन वर्षे ही वाघनखं महाराष्ट्रात असणार आहेत, असेही ते म्हणाले.

राज्यात यंदा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. हा भव्यदिव्य सोहळा साकारण्यासाठी सरकारने प्रभावी नियोजन सुरू केले आहे. त्याच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला, ती वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. ही वाघनखं आणण्यासाठी मुनगंटीवार उद्या (ता. १ ऑक्टोबर) लंडनसाठी रवाना होणार आहेत.

लंडनमध्ये लाखोंच्या संख्येने शिवभक्त आहेत. त्यांनाही या बाबीचा मोठा आनंद आहे. लंडनहून वाघनखं आणताना लंडनमधील शिवभक्तांनीही भव्य तयारी सुरू केली आहे. लंडनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात तेथील शिवभक्त फेटे घालून जंगी यात्रा काढणार आहेत, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.

शिवाजी महाराजांसंबंधीच्या अनेक ऐतिहासिक वस्तू लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. यांपैकी वाघनखं आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. मुनगंटीवार शिष्टमंडळासह लंडनला जाणार आहेत. सुरुवातीला ही वाघनखं एका वर्षासाठी देण्याचे ब्रिटिश सरकारने सांगितले होते. पण आता सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तीन वर्षे ही वाघनखं महाराष्ट्रात असणार आहेत.

ही वाघनखं देशासाठी आदर्शाची नवी मशाल असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. राज्यात शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे. सरकारने यासाठी एक कोटी शिवभक्तांच्या पोर्टलची निर्मिती केली आहे. या माध्यमातून हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी काम सुरू झाले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT