Sujat Ambedkar, Raj thackeray  Sarkarnama
विदर्भ

VBA News : ...तर राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित करेल; सुजात आंबेडकरांचा इशारा

Political News : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे आता वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Sachin Waghmare

Washim News : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे. एकीकडे महाविकास आघाडी व महायुतीमधील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे तर दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातुनच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे आता वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी झाल्यानंतर आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेत उमेदवार घोषित करून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांनी वाशिमच्या आसेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. या सभेदरम्यान बोलताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) चांगलीच सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे आता वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.

राज्यातील मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढत असल्याचे यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी थेट इशारा दिला. आम्ही मोठमोठे स्पीकर लावू, भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू, मात्र त्याला विरोध करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचे काम सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील, असे वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीविरुद्ध मनसे असा वाद रंगण्याची शक्यता आहे. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदा औरंगजेब याच्या कबरवर कुणी गेले असेल ते बाळासाहेब आंबेडकर हे गेले होते. जेंव्हा केंव्हा मुस्लिमांवर संकट येतील त्या वेळेस केवळ वंचित बहुजन आघाडी मदतीला येईल, असे वक्तव्य देखील सुजात आबेडकर यांनी केले.

येत्या काळात जोपर्यंत मुस्लिम समाजाचे चार-पाच आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत त्यांच भलं होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रस्थापित नेते आमचा विकास करू शकणार नाहीत. आमची फक्त एकच मागणी असली पाहिजे की 15 टक्के मुस्लीम समाज महाराष्ट्रात आहे आणि जो पक्ष 15 टक्के त्यांना भागीदारी देईल, 15 टक्के उमेदवारी देईल, त्यांनाच मतदान करून आपल्याला विजय करायचे आहे, असे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT