Mahayuti News : कोण घेणार माघार, अजितदादा की फडणवीस ? खडकवासला, वडगाव शेरी कोणाकडे जाणार?

Political News : भाजपकडे असलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाला तर अजित पवारांकडे असलेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला येणार असल्याच्या चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.
Ajit Pawar & Devendra Fadanvis
Ajit Pawar & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुतीतील जागावाटपाच्या चर्चा अद्यापही सुरू आहेत. बहुतांश जागांचा तिढा सुटला असला तरी काही जागांवर अद्यापही महायुतीतील मित्रपक्ष वाटाघाटी करत आहेत. पुणे शहरातील बहुतांश जागांबाबत एकमत झाले असून सध्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहे.

भाजपकडे असलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाला तर अजित पवारांकडे असलेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला येणार असल्याच्या चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकीकडे वडगाव शेरीमधील भाजपमधील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर दुसरीकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघात देखील अजित पवार गटातील इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहे. (Mahayuti News)

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघाचा जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचे बोललं जात आहे. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ आणि हडपसर या मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत महायुतीतील मित्र पक्षांमध्ये एक मत असल्याचे बोलले जात आहे. यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ हा अजित पवाराकडे राहणार असून इतर पाच विधानसभा मतदारसंघ भाजपकडे (Bjp) असतील असे बोलले जात आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघांमधून यंदा उमेदवार बदलावा, अशी जोरदार मागणी भाजपचे स्थानिक नेते करत आहेत. विद्यमान आमदाराबाबत मतदारसंघात आणि भाजपमध्ये अंतर्गत देखील नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास पोर्षे अपघात प्रकरणामुळे बॅकफूटवर गेलेले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नाही, याबाबत महायुतीतील मित्र पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचे बोललं जात आहे.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
MVA Politics : मविआच्या जागावाटपाचा वाद विकोपाला, ठाकरे गटाने घेतली मोठी भूमिका; 'नाना पटोले बैठकीला असतील तर...'

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांनी सभा घेऊन सुनील टिंगरे यांना थेट टार्गेट करत आव्हान दिले. अशा परिस्थितीत जर सुनील टिंगरे (Sunil Tingre ) यांना उमेदवारी दिल्यास पोर्षे अपघात प्रकरणाचे विरोधी पक्ष भांडवल करू शकतो. याचा निगेटिव्ह इफेक्ट सबंध महाराष्ट्रात देखील होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अदलाबदली होणार का? याबाबत चर्चांचे खल सुरू आहेत.

अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाबाबत अद्यापही निर्णय झाला नसून चर्चा सुरू असल्याचे सांगितला आहे. त्यामुळे खडकवासल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण झाला असून खडकवासल्याची जागा अजित पवार गटाला सुटल्यास आपला दावा भक्कम व्हावा, यासाठी या इच्छुकांकडून आता जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
Mahayuti News : कल्याण पूर्वेत महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार ताणाताणी; भाजप, शिवसेना शिंदे गटात वादाची शक्यता

सोशल मीडियावर पोस्टसह, परिसरातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी आणि भेटीगाठींचा सत्र सुरू झाले आहे. या विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांसोबत असलेले माजी महापौर दत्ता धनकवडे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

'सरकारनामा'शी बोलताना दत्ता धनकवडे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मी खडकवासला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. यंदा देखील खडकवासल्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आणि दादांनी मला संधी दिली तर निश्चितच ही मी निवडणूक लढवेल आणि जिंकेल, तशी माझी तयारी देखील सुरू आहे.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
NCP Politics: भाजप नेते गणेश गीतेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश रखडला?, नेते म्हणाले, थोडे थांबा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com