Nagpur Politics : नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांची नियुक्ती करण्याची शिफारस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. त्यावरून नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. नागपूर जिल्ह्यात एकही सक्षम पदाधिकारी नाही का अशी विचारणा केली जात आहे. असे असले तरी कायद्याच्या कसोटीवर सुलभा खोडके यांची नागपूर सुधार प्रन्यासवर नियुक्त होऊ शकत नाही असा, त्या नंतरही केल्यास ती बेकायदेशीर ठरेल असा दावा केला जात आहे.
नागपूर सुधार प्रन्यासची स्थापना नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी एक विश्वस्त मंडळाची नेमणूक केली जाते. या मंडळात नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, नागपूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगर रचना उपसंचालक, एक नगरसेवक, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती हे पदसिद्ध विश्वस्त असतात. आमदारांमधून एक तसेच सामाजिक क्षेत्रातून दोन असे एकूण १० विश्वस्त नेमण्याची तरतूद सुधार प्रन्यासच्या कायद्यात आहे.
विधानसभा सदस्य म्हणून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची यापूर्वीच नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे आमदारांचा कोटा संपुष्टात आला आहे. सामाजिक क्षेत्रातून शिवसेनेचे संदीप इटकेलवार आधीच येथे आहे. एक जागा रिक्त आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची आहे. या जागेवर कोणाची नेमणूक करायची याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायचा आहे. सुधार प्रन्यास हे नागपूर जिल्हा विकास प्राधिकरण असल्याने नागपूर जिल्ह्यातीलच विश्वस्त सुधार प्रन्यासवर नेमता येतो. नागपूर सुधार प्रन्यासच्या ॲक्टमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. हे बघता अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांची नियुक्त बेकयदेशीर ठरले असा दावा केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विधिमंडळ सचिवांना दिलेल्या पत्रात आमदार म्हणून सुलभा खोडके यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचे मानले जाणारे सुधार प्रन्यासचे विश्वस्तपद रिक्त ठेवले होते. त्यावेळी अनेकांची नावे चर्चेत होती. अनेकांना तुमच्या नावाचे पत्र तयार आहे असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात अडीच वर्षांच्या कार्यकाळात हे पत्र कधीच बाहेर निघाले नाही. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आहे. एक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसने हे पद रिक्त ठेवले आहे. भाजप आणि शिवसेना ही तत्काळ नियुक्ती करून मोकळी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.