NCP Nagpur : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसवर भरवसा न्हाय, झेडपी निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी सुरू

Sharad Pawar NCP Nagpur Strategy : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसवर भरोसा नाही. आघाडी झाली तर सन्मानजनक जागा सोडल्या जातील याची खात्रीसुद्धा नाही. हे बघून पक्षाच्यावतीने समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sharad pawar NCP, Congress
NCP leaders including Sharad Pawar, Anil Deshmukh, and Ramesh Bang attend a key Nagpur meeting discussing seat-sharing and alliance strategy for the upcoming Zilla Parishad electionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 17 Oct : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसवर भरोसा नाही. आघाडी झाली तर सन्मानजनक जागा सोडल्या जातील याची खात्रीसुद्धा नाही. हे बघून पक्षाच्यावतीने समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून इच्छांकडून अर्ज मागवले जाणार आहेत तसेच तालुकानिहाय बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला विदर्भाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, माजी जिल्हा परिषद सलील देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यापूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. असे असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते.

Sharad pawar NCP, Congress
Chhagan Bhujbal : ‘या लोकांना माझा इतिहास माहित नाही', त्यावेळी ते शाळेत असतील ; बीडच्या सभेआधीच भुजबळांनी डिवचलं..

यामुळे यावेळी आघाडी झाली तर ती तालुकानिहाय करण्यात यावी. ज्या तालुक्यांमध्ये ज्या पक्षाचे बळ आहे तेथे त्यांना जागा सोडण्यात याव्या अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तालुक्याची राजकीय स्थिती बघूनच जागा वाटपाचा निर्णय व्हावा. त्यानंतरही सन्मानजनक जागा सोडल्या जाणार नसतील तर काँग्रेससोबत आघाडी करण्यास काही अर्थ नाही.

त्यापेक्षा धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्ष, संघटनांना एकत्रित करून नवी आघाडी तयार करावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याबाबत वाटाघाटी, बोलणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे आणि सलील देशमुख यांना अधिकार देण्यात आले.

Sharad pawar NCP, Congress
Shivsena UBT : मुंबईतील 'त्या' बैठकीला नागपुरच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांची दांडी; उद्धव ठाकरेंनी दिले मोठे संकेत

या बैठकीला माजी आमदार विजय घोडमारे, माजी आमदार प्रकाश गजभिये, किशोर गजभिये, शेखर कोल्हे, अविनाश गोतमारे, प्रेम झाले, महिला अध्यक्ष वैशाली टालाटुले, युवक अध्यक्ष दिनेश साळवे, युवती अध्यक्ष रश्मी आरघोडे आदी उपस्थित होते.

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 32 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. सत्ता स्थापनेच्यावेळी काँग्रेसने उपाध्यक्षपद देण्यास राष्ट्रवादीला नकार दिला होता. दबावानंतर फक्त सभापतिपद काँग्रेसने राष्ट्रवादीला दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com