Sunil Kedar Bail Rejected Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar Bail Rejected|मोठी बातमी : सुनील केदारांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; शिक्षेस स्थगिती नाही!

Sunil Kedar Bail Rejected : सुनील केदारांना सर्वात मोठा धक्का...

Chetan Zadpe

Nagpur News : नागपूर जिल्हा अतिरीक्त सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे केदार यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे केस जामिनावर सोडणं, हे चुकीचं असेल असं न्यायालयाने म्हटलं आहे. (Latest Marathi News)

बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळाप्रकरणी (NDCCB) मुख्य न्यायदंडाधिकारी कार्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदार यांनी निकालाविरोधात सत्र न्यायालायत धाव घेतली होती. शिक्षा झाल्यानंतर माजी मंत्री सुनील केदार सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार होते. आजच्या निर्णयानंतर आता त्यांना शिक्षा भोगायची तयारी करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

सुनील केदारांची आमदारकी रद्द -

सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक (NDCC) घोटाळा प्रकरणात दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील केदारांना मोठा धक्का बसला आहे.

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी न्यायालयाचे आदेश विधिमंडळाला पाठवले होते. यानंतर सुनील केदारांची आमदारकी रद्द करण्यात आली. कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT